आजच्या धकाधकीच्या जीवनात तणाव हा प्रत्येकाच्याच आयुष्याचा एक भाग झाला आहे.(damage) कामाचा वाढलेला ताण, आर्थिक चिंता, कौटुंबिक जबाबदाऱ्या, झोपेचा अभाव या सगळ्यामुळे शरीरात एक हार्मोन वाढतं ज्याचं नाव आहे कॉर्टिसोल. हे हार्मोन आवश्यक असलं, तरी सतत वाढलेलं कॉर्टिसोल हृदयासाठी मात्र घातक ठरतेय असा इशारा तज्ज्ञांनी दिला आहे. ताण हा जीवनाचा अविभाज्य भाग आहे. तथापि, ताणाचे व्यवस्थापन करणे आणि हृदयाचे संरक्षण करणे गरजेचे आहे. उच्च कोलेस्ट्रॉलप्रमाणेच, दीर्घकालीन ताण तुमच्या हृदयाला नुकसान पोहोचवू शकतो. आता ताण कमी करण्याची, शांत राहण्याची आणि त्याद्वारे हृदयाला निरोगी ठेवण्याची वेळ आली आहे.

देशभरात सर्वच वयोगटांतील लोकांमध्ये हृदयाच्या समस्या मोठ्या प्रमाणावर दिसून येतात. (damage) अनेक वर्षांपासून, हृदयाच्या समस्यांच्या बाबतीत उच्च कोलेस्ट्रॉलला मुख्य गुन्हेगार मानले जाते. उच्च कोलेस्ट्रॉलच्या पातळीचा हृदयावर परिणाम होतो हे प्रत्येकालाच माहित आहे. सध्या व्यावसायिक आणि वैयक्तिक जीवनातील तणाव, आर्थिक चिंता आणि वाढलेला स्क्रीन टाईममुळे तणावाचे प्रमाण वाढतेय. या ताणामुळे कॉर्टिसोलची पातळी वाढते, जे एक संप्रेरक आहे जे आपल्याला आपत्कालीन परिस्थितीत मदत करते. जेव्हा कॉर्टिसोलची पातळी वाढते, तेव्हा ते हृदय आणि रक्तवाहिन्यांना नुकसान पोहोचवू शकते.
तणावाच्या वेळी आपले शरीर कॉर्टिसोल सोडते. जेव्हा सतत ताण येत राहतो, (damage) तेव्हा अनेक समस्या सुरू होतात. कॉर्टिसोलची उच्च पातळी रक्तदाब वाढवते, रक्तातील साखर वाढवते आणि पोटाभोवती चरबी साठण्यास प्रोत्साहन देते. कालांतराने यामुळे हृदयावर अतिरिक्त ताण येतो ज्यामुळे तुम्हाला हृदयविकाराचा झटका येऊ शकतो. दीर्घकालीन ताणामुळे शरीरातील सूज इन्फ्लेमेशन येते. ही सूज रक्तवाहिन्यांना नुकसान पोहोचवते आणि प्लेक जमा होण्यास मदत करते, ज्यामुळे हृदयविकाराचा झटका तसेच पक्षाघाताचा धोका वाढतो. उच्च कॉर्टिसोलमुळे झोपेत व्यत्यय येतो, शारीरिक हालचाल कमी होऊ शकते, खाण्याच्या चुकीच्या सवयी लागू शकतात आणि हृदयाला याचा त्रास होऊ शकतो.

ताणामुळे धूम्रपान, कॅफीनचे वाढते सेवन, चुकीचा आहार (damage) आणि व्यायामाचा अभाव यांसारख्या वाईट सवयी देखील लागू शकतात. या सर्व गोष्टींमुळे हृदय विकाराचा धोका वाढतो. अनेक लोकांमध्ये कोलेस्ट्रॉलची पातळी सामान्य असूनही, अनियंत्रित ताणामुळे त्यांना हृदयाच्या समस्या उद्भवू शकतात. तणावमुक्त राहणे आणि हृदयाचे संरक्षण करणे आवश्यक आहे. कोर्टिसोलची पातळी कमी करण्यासाठी आणि हृदयाचे संरक्षण करण्यासाठी या महत्त्वाच्या टिप्स फॉलो करा.वरिल महत्त्वाच्या टिप्सचे पालन केल्यास तुमचे हृदय निरोगी राहील. दीर्घकालीन तणाव हा हृदयरोग विकारासाठी एक धोकादायक घटक ठरतो. कोर्टिसोलची उच्च पातळी नियमित तपासण्यांमध्ये दिसून येत नाही, परंतु त्याचा हृदयाच्या आरोग्यावर परिणाम होऊ शकतो. म्हणून, हृदयाच्या आरोग्याच्या बाबतीत माहितीपूर्ण निर्णय घ्या आणि तणावाचे वेळीच व्यवस्थापन करा.
हेही वाचा :
गोड, जंक फूडमुळे लहान मुलांमध्ये वाढतोय मधुमेहाचा धोका
मोठी बातमी! मतदानावर बहिष्कार, महापालिका निवडणूक संकटात
तरुणीला बॉयफ्रेंडसोबत नको त्या अवस्थेत पकडलं, कुटुंबीयांकडून अन्