बॉलिवूड अभिनेता गोविंदा आणि त्याची पत्नी सुनीता अहुजा यांच्या वैवाहिक (marriage) आयुष्यात तणाव वाढल्याच्या चर्चा सध्या रंगत आहेत. सुनीताने पुन्हा एकदा गोविंदावर विवाहबाह्य संबंधाचा आरोप करत खळबळ उडवली असून त्यामुळे त्यांच्या 40 वर्षांच्या संसारावर प्रश्नचिन्ह उपस्थित झालं आहे. या पार्श्वभूमीवर अखेर गोविंदाने पहिल्यांदाच सार्वजनिकरित्या प्रतिक्रिया दिली आहे.पत्नीच्या आरोपांवर बोलताना गोविंदाने थेट सवाल उपस्थित करत, “माझ्या लग्नाला 40 वर्षे झाली आहेत. मी दोन-तीन वेळा लग्न केलं आहे का?” असं म्हणत आरोप फेटाळून लावले. त्यांच्या या वक्तव्यामुळे हा वाद आणखी चर्चेत आला असून चाहत्यांमध्येही उत्सुकता वाढली आहे.

गोविंदाने दिलेल्या प्रतिक्रियेत सांगितलं की, चित्रपटसृष्टीत अनेक गोष्टी (marriage) गॉसिप म्हणून पसरवल्या जातात, मात्र त्याने नेहमी आपल्या कुटुंबाला प्राधान्य दिलं आहे. “जे लोक वारंवार लग्न करतात, त्यांच्या पत्नी काहीच बोलत नाहीत. मात्र माझ्याबाबत विनाकारण चर्चा केली जाते,” असं म्हणत त्याने स्वतःवरील आरोपांना प्रत्युत्तर दिलं.त्याचवेळी गोविंदाने असा दावा केला की, त्याच्या विरोधात काही लोक कट रचत आहेत आणि या सगळ्यात त्याची पत्नी आणि पुतण्या कृष्णा अभिषेक यांचा गैरवापर केला जात असल्याची त्याला शंका आहे. “माझा अपमान करण्यासाठी काही लोक कृष्णाचा वापर करत आहेत, याची मी त्यालाही कल्पना दिली आहे,” असंही त्याने स्पष्ट केलं.
पत्नीने गोविंदाने मुलाच्या करिअरसाठी काहीच केलं नाही, असा आरोपही केला होता.(marriage) त्यावर उत्तर देताना गोविंदाने सांगितलं की, तो कधीही निर्माते-दिग्दर्शकांशी आपल्या मुलांसाठी शिफारस करत नाही. “ही इंडस्ट्री माझं कुटुंब आहे. जिथे मी पैसा आणि प्रसिद्धी मिळवतो, त्यालाच कलंकित करण्याची माझी इच्छा नाही,” असं तो म्हणाला.
दरम्यान, या वादामुळे गोविंदा-सुनीता यांच्या वैवाहिक नात्यावर नेमका काय परिणाम होणार, याकडे चाहत्यांचं लक्ष लागलं आहे. सध्या दोघांकडून कोणताही अधिकृत निर्णय जाहीर झालेला नसला तरी, हे प्रकरण बॉलिवूडमध्ये चर्चेचा विषय ठरत आहे.
हेही वाचा :
उद्या Toyota ची Electric SUV लाँच होणार! मिळणार धमाकेदार फीचर्स आणि किंमत फक्त…
झुरळांना संपवण्यासाठी हे पान करेल खूप मदत, पाण्यात टाका स्वयंपाक घरातील हा पदार्थ
कोल्हापुरात भाजपचा कंडका पडणार; शिंदे गट काँग्रेससोबत जाणार?