बॉलिवूड अभिनेत्री आणि खासदार कंगना राणौत त्यांच्या सिनेमांमुळे (magic) कमी पण वादग्रस्त प्रकरणामुळे अधिक चर्चेत असतात. कंगना यांनी बॉलिवूडमधील अनेक सेलिब्रिटींवर गंभीर आरोप केले आहेत. तर अनेक सेलिब्रिटींनी देखील कंगना यांच्यावर गंभीर आरोप केले आहेत. एकदा तर, कंगना राणौत यांना काळी जादू येते आणि त्यांनी अनेकांवर काळी जादू केली आहे.. असे देखील आरोप करण्यात आले. एवढंच नाही तर, कंगना यांना अनेकांनी चेटकीण देखील म्हटलं होतं. खरंतर, बऱ्याच वर्षांपूर्वी कंगना यांनी सद्गुरूंचा एक व्हिडिओ शेअर केला होता ज्यामध्ये 200 वर्षांपूर्वी महिलांना चेटकीण ठरवून जिवंत जाळलं जात होतं.

कंगना राणौत सोशल मीडिया पोस्टमध्ये म्हणाल्या होत्या, (magic) ‘जर तुमच्याकडे सुपर पॉवर असेल तर, तुम्हाला चेटकीण म्हणटलं जातं. मला एक चेटकीण असं म्हटलं जायचं. पण मी कधीच त्यांच्यासाठी स्वतःला उद्ध्वस्त केलं नाही. त्याऐवजी मी त्यांना…’ पुढे खिल्ली उडवत कंगना म्हणाली, ‘आबरा का डाबरा…’ व्हायला हवं…पुढे एका इन्स्टाग्राम स्टोरीमध्ये कंगना यांनी लिहिलेलं, ‘2016 मध्ये, एका मुद्रित संपादकाने एक लेख लिहिला होता ज्यामध्ये दावा केला होता की त्यांच्या एका तपास पत्रकाराकडे मला काळी जादू माहित असल्याचे पुरावे आहेत. एवढंच, नाही तर तिला खात्री होती की दिवाळीला सर्वांच्या घरी पाठवल्या जाणाऱ्या लाडूंमध्ये मी माझ्या मासिक पाळीचं रक्त मिसळायचे…’
पुढे कंगना म्हणाली, ‘ते दिवस देखील मजेदार होते… सिनेमा पार्श्वभूमी, शिक्षण,(magic) मार्गदर्शन, एजन्सी, गट किंवा मित्र / बॉयफ्रेंड नसतानाही, मी अव्वल होती… म्हणून ते सर्व एकत्रितपणे एकाच उत्तरावर आले की मी काळी जादू करते…’, असं देखील कंगना म्हणाली होत्या.सांगायचं झालं तर, कंगना राणौत स्टारर ‘राज़: द मिस्ट्री कंटीन्यूज’ सिनेमातील कोस्टार आणि एक्स बॉयफ्रेंड अध्ययन सुंमन याने दावा केला होता की, कंगना यांनी अभिनेत्याला स्वतःच्या मासिक पाळीचं रक्त प्यायला दिलं होतं. यावर एका मुलाखतीत कंगना म्हणालेली, जेव्हा लोक मला नावं ठेवतात आणि माझ्या मासिक पाळीबद्दल बोलतात तेव्हा मला त्रास होत नाही – पण त्याला वाईट म्हणू नका. कारण मासिक पाळीच्या रक्तात वाईट असं काहीच नसतं.’ कंगना कायम कोणत्या न कोणत्या कारणामुळे असते चर्चेत.
हेही वाचा :
उद्या Toyota ची Electric SUV लाँच होणार! मिळणार धमाकेदार फीचर्स आणि किंमत फक्त…
झुरळांना संपवण्यासाठी हे पान करेल खूप मदत, पाण्यात टाका स्वयंपाक घरातील हा पदार्थ
कोल्हापुरात भाजपचा कंडका पडणार; शिंदे गट काँग्रेससोबत जाणार?