गेल्या काही काळापासून जगातील अनेक देशांमधील तणाव वाढलेला आहे.(entering) इराण आणि अमेरिकेतील संघर्ष वाढला आहे. दोन्ही देशांकडून एकमेकांना धमक्या देण्यात येत आहे. काही दिवसांपूर्वी इराणने डोनाल्ड ट्रम्प यांच्या हत्येची धमकी दिली होती. त्यानंतर आता अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी एक निवेदन जारी केले आहे. यात त्यांनी म्हटले की, ‘माझी हत्या झाली तर इराणला जगाच्या नकाशावरून पुसून टाकले जाईल. मी माझ्या अधिकाऱ्यांना याबद्दल आदेश दिले आहेत. कारण मला माहिती आहे की इराण मला मारू इच्छित आहे.’ यानंतर आता असा प्रश्न उपस्थित होत आहे की इराण खरच अमेरिकेत घुसून ट्रम्प यांची हत्या करू शकतो का? याबाबत सविस्तर माहिती जाणून घेऊयात.

समोर आलेल्या माहितीनुसार, 16 जानेवारी रोजी इराणी(entering) सरकारी टीव्हीने ट्रम्प यांना हत्येची धमकी दिली होती. ‘यावेळी गोळी चुकणार नाही’ असं इराणने म्हटले होते. तसेच इराणी सरकारी टीव्हीने 2024 मध्ये डोनाल्ड ट्रम्प यांच्यावर झालेल्या हल्ल्याचे फुटेजही प्रकाशित केले आहे. यात निवडणूक प्रचारादरम्यान ट्रम्प यांच्यावर हल्ला होताना दिसत आहे. आता इराणच्या धमकीनंतर ट्रम्प यांची चिंता वाढली आहे.अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी न्यूज नेशनला एक मुलाखत दिली. यात ट्रम्प यांनी म्हटले की, इराणने हे करू नये, त्यांनी असे केले तर तर संपूर्ण इराण नष्ट होईल. आमचे सैनिक इराण सोडणार नाहीत. मात्र ट्रम्प यांनी त्यांच्या निवेदनात कधीही असे म्हटले नाही की इराण त्यांना मारू शकत नाही. 2024 मध्ये ट्रम्प यांच्यावर झालेल्या हल्ल्यासाठी इराणला जबाबदार धरले जात आहे. निवडणूक प्रचारादरम्यान पेनसिल्व्हेनियामध्ये ट्रम्प यांच्यावर गोळीबार झाला होता. यात ते थोडक्यात बचावले होते.

द हिलने माजी अॅटर्नी जनरल मेरिक गारलँड यांचा हवाला देताना म्हटले की, ट्रम्प यांच्या हत्येचा प्रयत्न हा माजी इराणी जनरल कासिम सुलेमानी यांच्या हत्येचा बदला होता. त्यानंतर आता गुप्तचर संस्थेने अलीकडेच व्हाईट हाऊसला एक अहवाल सादर केला. तसेच ट्रम्प यांच्या टीमलाही याबद्दल माहिती दिली आहे. ट्रम्प यांच्या इशाऱ्यावरून 2020 मध्ये कासिम सुलेमानीची हत्या करण्यात आली. सुलेमानी हे सर्वोच्च नेते अयातुल्ला अली खामेनी यांचे जवळचे सहकारी होते.

7000 इराणी नागरिक अमेरिकेत बेकायदेशीरपणे राहत आहेत. (entering) डोनाल्ड ट्रम्प यांनी याचे वर्णन धोका म्हणून केले आहे. ट्रम्प यांचा दावा आहे की, हे सर्व लोक जो बायडेन यांच्या सरकारच्या अपयशामुळे अमेरिकेत आले होते. मात्र आता ट्रम्प आता त्यांना हाकलून लावण्याचा प्रयत्न करत आहेत. 2024 मध्ये थॉमस मॅथ्यू क्रूक्स यांने ट्रम्पवर गोळ्या झाडल्या. नंतर त्याची हत्या करण्यात आली. मात्र त्या व्यक्तीचा कोणतीही माहिती मिळाली नाही. मात्र आता या प्रकरणांमध्ये इराणचे नाव समोर आले आहे.1963 मध्ये, अमेरिकेचे तत्कालिन राष्ट्राध्यक्ष जॉन एफ. केनेडी यांची गोळ्या घालून हत्या करण्यात आली होती. त्यावेळी केनेडी यांना ट्रम्प यांच्यासारख्याच दर्जाची सुरक्षा मिळत होती. मात्र केनेडी यांची हत्या कोणी केली हे अद्याप समोर आलेली नाही. त्यामुळे इराण ट्रम्प यांची हत्या करू शकतो की नाही हे ठोसपणे सांगता येत नाही. मात्र याआधी अमेरिकन राष्ट्राध्यक्षांची हत्या झालेली आहे, त्यामुळे अशी शक्यता नाकारता येत नाही.

हेही वाचा :

पंचायत समिती निवडणूक रणधुमाळी; उमेदवारीसाठी रस्सीखेच सुरू

भाजपचे नगरसेवक काँग्रेसच्या संपर्कात; वडेट्टीवारांचा दावा, सुधीर मुनगंटीवार म्हणाले…

सर्वात मोठी बातमी! लाडकी बहीण योजनेचा हप्ता बंद

By admin

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *