जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज (Flood)दाखल करण्याच्या अखेरच्या दिवशी हातकणंगले परिसरात राजकीय उत्साहाचे उधाण पाहायला मिळाले. तालुक्यातील ११ जिल्हा परिषद आणि २२ पंचायत समिती मतदारसंघांसाठी बुधवारी अर्ज भरण्याची अंतिम मुदत होती. या निमित्ताने सर्वच पक्षांच्या इच्छुक उमेदवारांनी जोरदार शक्तीप्रदर्शन केल्याने हातकणंगले पेठा भागात कार्यकर्त्यांचा अक्षरशः महापूर लोटला होता.सकाळी १० पासूनच रॅलींचा धडाकाअर्ज भरण्याची वेळ संपण्यापूर्वी आपला उमेदवारी अर्ज दाखल करण्यासाठी इच्छुकांनी आपापल्या मतदारसंघांतून सकाळी १० वाजल्यापासूनच रॅली काढण्यास सुरुवात केली होती. ढोल-ताशांच्या गजरात, घोषणाबाजी करत आणि शेकडो दुचाकी व चारचाकी वाहनांच्या ताफ्यासह उमेदवार तहसील कार्यालयाच्या दिशेने येत होते.

गावागावातून आलेल्या या कार्यकर्त्यांमुळे संपूर्ण हातकणंगले परिसर (Flood)निवडणूक मय झाला होता.सांगली-कोल्हापूर रस्ता ‘हाऊसफुल्ल’दुपारी १२ वाजेनंतर गर्दीने उच्चांक गाठला. एकाच वेळी अनेक रॅली तहसील कार्यालय परिसरात दाखल झाल्यामुळे सांगली-कोल्हापूर महामार्गावरील वाहतूक व्यवस्था पूर्णपणे कोलमडली. तारदाळ फाटा ते रामलिंग फाटा या दरम्यान रस्त्याच्या दोन्ही बाजूला समर्थकांनी आपली वाहने उभी केल्यामुळे मुख्य रस्त्यावर लांबच लांब रांगा लागल्या होत्या. तासनतास सुरू असलेल्या या वाहतूक कोंडीमुळे प्रवाशांचे मोठे हाल झाले. वाहतूक ठप्प झाल्यामुळे परिस्थिती हाताळताना पोलिसांना मोठी कसरत करावी लागली.
वाहनांचा प्रचंड ओघ आणि कार्यकर्त्यांची गर्दी यामुळे वाहतूक सुरळीत (Flood)करण्यासाठी पोलिसांना जादा कुमक मागवावी लागली. कडक ऊन असूनही पोलीस कर्मचारी रस्ता मोकळा करण्यासाठी प्रयत्नशील होते. राजकीय वातावरण तापले अर्ज भरण्याच्या शेवटच्या दिवशी झालेल्या या गर्दीवरून आगामी निवडणूक किती चुरशीची होणार, याची प्रचिती येत आहे. उमेदवारांनी केलेल्या या शक्तीप्रदर्शनामुळे हातकणंगले तालुक्यात आता प्रचाराचा धुरळा अधिक जोमाने उडणार असल्याचे स्पष्ट झाले आहे.
हेही वाचा :
पंचायत समिती निवडणूक रणधुमाळी; उमेदवारीसाठी रस्सीखेच सुरू
भाजपचे नगरसेवक काँग्रेसच्या संपर्कात; वडेट्टीवारांचा दावा, सुधीर मुनगंटीवार म्हणाले…
सर्वात मोठी बातमी! लाडकी बहीण योजनेचा हप्ता बंद