सध्या विवाहबाह्य संबंध आणि त्यातून घडणाऱ्या गुन्ह्यांची संख्या वाढू लागली आहे.(extramarital) असच एक धक्कादायक प्रकरण समोर आलं आहे. पत्नीने विवाहबाह्य संबंधात अडथळा ठरणाऱ्या पतीची अत्यंत क्रूर पद्धतीने हत्या केली. तिने नवऱ्यासाठी खास बिर्याणी बनवली. त्यात तिने झोपेच्या गोळ्यांची पावडर मिसळली. नवऱ्याला प्रेमाने बिर्याणी खाऊ घातली. बिर्याणीत झोपेच्या गोळ्यांची पावडर मिसळलेली असल्यामुळे नवऱ्याला गाढ झोप लागली. त्यावेळी तिने तिच्या प्रियकराला घरी बोलवून घेतलं. नंतर दोघांनी मिळून त्याची हत्या केली. आंध्र प्रदेशच्या गुंटुर जिल्ह्यात चिलुवुरु गावात ही घटना घडली.

सुरुवातीला तिने नवऱ्याचा मृत्यू नैसर्गिक असल्याचा भासवण्याचा प्रयत्न केला. (extramarital) या प्रकरणात दोन्ही संशयितांना अटक झाली आहे. फॉरेन्सिक तपासणीतून लोकम शिवांगाराजू याचा श्वास कोंडला गेल्यामुळे मृत्यू झाल्याचा समोर आलं. पत्नी लक्ष्मी माधुरीवर लोकम शिवांगाराजूच्या हत्येचा आरोप आहे. माधुरीचे गोपी नावाच्या व्यक्तीसोबत विवाहबाह्य संबंध होते, हे पोलीस तपासातून समोर आलय. गुन्हा घडला त्या रात्री माधुरीने झोपेच्या गोळ्यांची पावडर मिसळून बिर्याणी बनवली. नवऱ्याला तिने ही बिर्याणी खाऊ घातली. ही बिर्याणी खाऊन शिवांगाराजूला गाढ झोप लागली. त्यानंतर माधुरी आणि गोपीने शिवांगराजूचं तोंड उशीने दाबलं. अखेर श्वासकोंडला गेल्यामुळे त्याचा मृत्यू झाला.
दुसऱ्यादिवशी सकाळी माधुरीने गावकऱ्यांसमोर शिवांगराजूचा (extramarital) मृत्यू हार्ट अटॅकने झाल्याचा भासवण्याचा प्रयत्न केला. सकाळ झाल्यानंतर तिने हंबरडा फोडला. गावकरी गोळा झाल्यानंतर शिवांगराजूचा अचानक मृत्यू झाल्याचा तिने सांगितलं. शिवांगराजूचा मृतदेह पाहिल्यानंतर त्याच्या वडिलांना आणि मित्रांना शरीरावर काही जखमा आणि रक्ताचे डाग दिसले. त्यांना संशय आला. त्यांनी पोलिसांकडे तक्रार केली. पोस्टमार्टम रिपोर्टमधून मृत्यू श्वासकोंडल्यामुळे झाल्याचं स्पष्ट झालं. नैसर्गिक मृत्यूची शक्यता फेटाळून लावली.माधुरी आणि गोपीला पोलिसांनी ताब्यात घेतलं. माधुरीच्या मोबाइल फोनची फॉरेन्सिक तपासणी झाल्यानंतर धक्कादायक बाबी समोर आल्या. रात्रभर ती नवऱ्याच्या प्रेताशेजारी बसून पॉर्न व्हिडिओ पाहत होती.
हेही वाचा :
स्मृती मंधानाच्या बालमित्राची पलाश मुच्छलकडून फसवणूक; सांगली पोलिसांत तक्रार दाखल
रात्री वायफाय चालू ठेवून झोपताय? आरोग्यासाठी आहे धोकादायक
कोल्हापुरात राजकीय हालचालींना वेग; राष्ट्रवादीची एकजूट आणि घड्याळ चिन्हावर निर्णायक लढत