चारित्र्याच्या संशयावरून पती-पत्नीमध्ये वादानंतर बहुतेक वेळा (hurry)अशा घटनांमध्ये टोकाची पावले उचलल्या गेल्याची उदाहरण आहेत. कोल्हापुरातही अशीच एक घटना घडली आहे. आपल्या पत्नीच्या चारित्र्यावर संशय घेऊन पतीने एका निर्जन स्थळी नेत डोक्यात दगड घालून तिचा खून केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. याप्रकरणी पतीला पोलिसांनी ताब्यात घेतलंय. ही घटना गुरुवारी 22 जानेवारी रात्री नऊच्या सुमारास कोल्हापूरच्या निमशिरगाव ता. शिरोळ, जि. कोल्हापूर परिसरात उघडकीस आली आहे. ‘फिरायला जाऊया’ या बहाण्याने पत्नीला निर्जन तुकाई डोंगरावर नेल्यानंतर चारित्र्याच्या संशयाने तिच्या डोक्यात दगड घालून आणि धारदार शस्त्राने वार करून पतीने खून केला आहे.

सायराबानू उमर पुळूजकर वय 27, रा. बोर्गी, ता. जत, जि. सांगली (hurry)असे खून झालेल्या महिलेचे नाव असून, तिचा पती उमर मैनुद्दीन पुळूजकर वय 28 याने हे कृत्य केले आहे. जयसिंगपूर पोलिसांनी संशयित उमरला ताब्यात घेतले असून, त्याने गुन्ह्याची कबुली दिली आहे. सांगली येथील या दाम्पत्याला दोन मुले आणि तीन महिन्यांची एक मुलगी असल्याने घटनेने कुटुंब आणि परिसरात हळहळ व्यक्त होत आहे.मिळालेल्या माहितीनुसार, उमर पुळूजकर याला दीर्घकाळापासून पत्नी सायराबानूच्या चारित्र्यावर संशय होता. याच कारणावरून दोघांमध्ये वारंवार वाद होत असत. गुरुवारी उमरने ‘दानोळी येथील मामाकडे जायचे आहे’ असे सांगून सायराबानूला सोबत घेतले. मात्र, वाटेतच त्याने तिला निमशिरगावजवळील तुकाई डोंगराच्या निर्जन ठिकाणी नेले. तेथे त्याने प्रथम तिच्या डोक्यात दगड घातला आणि नंतर धारदार शस्त्राने अनेक वार केले. सायराबानू जागीच मृत्यू पावली. घटनेनंतर उमरने दानोळी येथील मामांना फोन करून कृत्याची माहिती दिली. मामांनी तात्काळ निमशिरगाव पोलिस पाटलांशी संपर्क साधला, ज्यांनी जयसिंगपूर पोलिसांना सूचित केले.
पोलिस निरीक्षक सत्यवान हाके यांच्या नेतृत्वाखालील पथक रात्री (hurry)साडेनऊच्या सुमारास तुकाई डोंगरावर पोहोचले. तेथे रक्ताच्या थारोळ्यात सायराबानूचा मृतदेह आढळून आला. पोलिसांनी घटनास्थळाची तपासणी करून रात्री उशिरापर्यंत पंचनामा केला. मृतदेह उत्तरीय तपासणीसाठी सांगली सिव्हिल रुग्णालयात पाठवण्यात आला आहे. संशयित उमरला जयसिंगपूर पोलिसांनी ताब्यात घेतले असून, त्याने चारित्र्य संशय हे खूनाचे मुख्य कारण असल्याची कबुली दिली आहे. पोलिसांनी गुन्हा दाखल करून तपास सुरू केला असून, आणखी साक्षीदारांची चौकशी आणि पुरावे गोळा केले जात आहेत.दरम्यान या घटनेने स्थानिक पातळीवर संतापाची लाट उसळली असून, चारित्र्याच्या संशयाने होणाऱ्या कौटुंबिक हिंसेप्रती समाजाने सजग राहण्याची गरज आहे. जयसिंगपूर पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, हे प्रकरण खून आणि कौटुंबिक हिंसाचाराचे गंभीर उदाहरण आहे.
हेही वाचा :
स्मृती मंधानाच्या बालमित्राची पलाश मुच्छलकडून फसवणूक; सांगली पोलिसांत तक्रार दाखल
रात्री वायफाय चालू ठेवून झोपताय? आरोग्यासाठी आहे धोकादायक
कोल्हापुरात राजकीय हालचालींना वेग; राष्ट्रवादीची एकजूट आणि घड्याळ चिन्हावर निर्णायक लढत