सांगली मधून धक्कादायक बातमी समोर आली आहे.(survives) सांगली शहरातील धामणी चौक येथे असणाऱ्या मयूर नर्सरीला भीषण आग लागली. या आगीमध्ये होरपळून महिलेचा संशयास्पद मृत्यू झाला. निकिता शिव मनगुळे-लोंढे असे आगीत मृत्यू झालेल्या महिलेचे नाव आहे. या भीषण आगीत नर्सरीचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले. याप्रकरणी विश्रामबाग पोलीस कसून तपास करत आहेत.

मिळालेल्या माहितीनुसार, निकिता मनगुळे-लोंढे व (survives)तिचा पती कर्नाटकातील कागवाड येथील असून ते सध्या सांगली शहरातील धामणी चौकातील मयूर नर्सरीमध्ये राहण्यास होते. रात्री साडेदहा वाजण्याच्या सुमारास नर्सरीमध्ये असणाऱ्या पत्राच्या शेडला व नर्सरी मधील झाडांना आग लागली. आगीची माहिती समजताच महापालिकेच्या अग्निशमन विभागाने घटनास्थळी धाव घेत आग आटोक्यात आणली.
अग्निशमन घटनस्थळी पोहचेपर्यंत महिला ज्या पत्र्याच्या शेडमध्ये (survives)राहत होती त्या ठिकाणी ती होरपळली. शिवाय त्या पत्र्याच्या शेडला बाहेरून कडी असल्याचे निदर्शनास आले. तसेच आगीच्या घटनेनंतर तिच्या पतीने घटनास्थळावरून पलायन केल्याचे स्थानिकांनी सांगितले.आगीत होरपळून मृत्यू झालेल्या महिलेच्या पतीचा शोध रात्री उशिरापर्यंत विश्रामबाग पोलिसांकडून घेतला जात होता. दरम्यान निकिता मनगुळे-लोंढे हिचा आगीत होरपळून मृत्यू झाला की तिचा पतीने घातपात केला. याबाबत ही विश्रामबाग पोलीस कडून तपास केला जातो आहे.
हेही वाचा :
स्मृती मंधानाच्या बालमित्राची पलाश मुच्छलकडून फसवणूक; सांगली पोलिसांत तक्रार दाखल
रात्री वायफाय चालू ठेवून झोपताय? आरोग्यासाठी आहे धोकादायक
कोल्हापुरात राजकीय हालचालींना वेग; राष्ट्रवादीची एकजूट आणि घड्याळ चिन्हावर निर्णायक लढत