जिल्ह्यातील १८ लाख मतदार ५ फेब्रुवारीला मिनी मंत्रालय म्हणून (held) ओळखल्या जाणाऱ्या जिल्हा परिषदेच्या ६१ सदस्यांची निवड करणार आहेत. याबरोबरच जिल्ह्यातील १० पंचायत समिती सदस्य निवडले जाणार आहेत.यासाठी २०३९ मतदान केंद्रावर मतदान होणार आहे.सांगली जिल्हा परिषदा व त्याअंतर्गत १० पंचायत समित्यांच्या सार्वत्रिक निवडणुकांकरिता प्रत्यक्ष निवडणूक कार्यक्रम जाहीर केला आहे. यामध्ये जिल्हा परिषद सांगली व आटपाडी, जत, खानापूर विटा, कडेगाव, तासगाव, कवठेमहांकाळ, पलूस, वाळवा-ईश्वरपूर, शिराळा व मिरज या १० पंचायत समितींचा समावेश आहे. मतदान दि. ५ फेब्रुवारी तर मतमोजणी दि. ७ फेब्रुवारी रोजी होणार आहे.निवडणुकीची आदर्श आचारसंहिता निवडणूक जाहीर झाल्यापासून सुरू झाली असून ती निवडणुकीचा निकाल जाहीर होईपर्यंत अंमलात राहील.

ही आचारसंहिता निवडणूक होणाऱ्या जिल्हा परिषद, पंचायत समिती क्षेत्रात लागू राहील. (held) या कालावधीत सर्वांनी ‘आदर्श आचारसंहितेचे’ तंतोतंत पालन करावे आणि निवडणूक शांततेत पार पाडण्यासाठी प्रशासनास पूर्ण सहकार्य करावे, असे आवाहन जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक अधिकारी अशोक काकडे यांनी केले आहे.जिल्हाधिकारी काकडे म्हणाले, सांगली जिल्ह्यामध्ये ६१ गटांमध्ये आणि १२२ गणांमध्ये जिल्हा परिषद व पंचायत समितीची निवडणूक होणार आहे. एकूण १८ लाख १८ हजार ७३६ मतदार आहेत.२०३९ मतदान केंद्रांवर मतदान होणार आहे. या सर्व मतदान केंद्रांवर मतदान निर्भय व पारदर्शी वातावरणात पार पडावे, यासाठी आचारसंहितेची अंमलबजावणी जिल्हा परिषदेच्या कार्यक्षेत्रामध्ये आजपासून सुरू झालेली आहे. या सर्व ठिकाणी निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून प्रांतअधिकारी अथवा तहसीलदार यांची नेमणूक करण्यात येत असल्याचे ते म्हणाले.
जिल्हा परिषदा व त्याअंतर्गत पंचायत समित्यांच्या सार्वत्रिक (held) निवडणुकीचा कार्यक्रम पुढीलप्रमाणे नामनिर्देशन पत्र देण्याचा कालावधी – दि. १६ ते दि. २० जानेवारी, नामनिर्देशनपत्र स्वीकारण्याचा कालावधी – दि. १६ ते २१, नामनिर्देशनपत्राची छाननी व त्यावर निर्णय देणे – दि. २२ जानेवारी, वैधरित्या नामनिर्देशित झालेल्या उमेदवारांची यादी प्रसिध्द करण्याचा दिनांक – दि. २२ जानेवारी छाननी पूर्ण झाल्यानंतर लगेच. उमेदवारी मागे घेण्याचा मुदत– दि. २३, २४ व २७ जानेवारी. निवडणूक लढविणाऱ्या उमेदवारांची यादी प्रसिध्द करणे व निशाणी वाटप – दि. ३७ जानेवारी. मतदान ५ फेब्रुवारी आणि मतमोजणी दि. ७ फेब्रुवारी.
हेही वाचा :
२० जिल्हा परिषदांच्या निवडणुका दुसऱ्या टप्प्यात
युजवेंद्र चहल – धनश्री वर्मा घटस्फोटानंतर एकत्र येणार? क्रिकेटरने पोस्ट करून स्वतः
ट्रॅफिक चालान न भरल्यास आरसी रद्द, लायसन्स होणार सस्पेंड; सरकार नवीन