लाडकी बहीण योजनेच्या लाभार्थी महिला जानेवारीच्या हप्त्याची वाट पाहत आहे.(deposited) जानेवारी महिना जवळपास संपत आला आहे. महिना संपत आला असला तरीही महिलांच्या खात्यात हप्ता जमा झालेला नाही. डिसेंबरचा हप्ता जानेवारी महिन्यात देण्यात आला होता. त्यानंतर आता जानेवारीचा हप्तादेखील पुढे जाणार आहे. फेब्रुवारी महिन्यात महिलांना जानेवारीचा हप्ता मिळण्याची शक्यता आहे.राज्यात सध्या निवडणुकांचे वारे वाहत आहेत. जिल्हा परिषदेच्या निवडणुका ५ फेब्रुवारी रोजी होणार आहे. जिल्हा परिषदेच्या निवडणुकीआधी महिलांच्या खात्यात जानेवारीचा हप्ता जमा केला जाऊ शकतो. याआधीही महापालिका निवडणुकीआधी डिसेंबरचा हप्ता जमा केला होता.

त्यामुळे यावेळेसदेखील जिल्हा परिषदेच्या निवडणुकीआधी (deposited)महिलांच्या खात्यात पैसे जमा केले जाऊ शकतात.जिल्हा परिषदेची निवडणुक ५ फेब्रुवारीला होणार आहे. त्यानंतर निकाल ७ तारखेला लागणार आहेत. त्याआधीच महिलांना पैसे मिळणार असल्याचे बोलले जात आहे. याबाबत कोणतीही अधिकृत माहिती समोर आलेली नाही. मात्र, लवकरच याबाबत घोषणा केली जाऊ शकते.
लाडकी बहीण योजनेत अनेक महिलांचा लाभ बंद झाला आहे. (deposited)महिलांनी केवायसीमध्ये प्रश्नांची चुकीची उत्तरे दिली असल्याने त्यांचा लाभ बंद केला आहे. प्रश्न न कळल्यामुळे महिलांनी त्याची उत्तरे चुकीची दिल्याचे निदर्शनास आले आहे. त्यामुळेच आता त्यावर मार्ग काढला आहे. महिलांची आता प्रत्यक्ष तपासणी केली जाणार आहे. अंगणवाडी सेविका महिलांची पडताळणी करणार आहे. त्यानंतर महिलांना त्यांची चूक सुधारण्याची संधी मिळणार आहे.
हेही वाचा :
स्मृती मंधानाच्या बालमित्राची पलाश मुच्छलकडून फसवणूक; सांगली पोलिसांत तक्रार दाखल
रात्री वायफाय चालू ठेवून झोपताय? आरोग्यासाठी आहे धोकादायक
कोल्हापुरात राजकीय हालचालींना वेग; राष्ट्रवादीची एकजूट आणि घड्याळ चिन्हावर निर्णायक लढत