ई-केवायसीमध्ये चुकीची माहिती भरल्यामुळे लाडकी बहीण योजनेतून (beloved) हजारो महिला अपात्र ठरल्या होत्या. गेल्या दोन-तीन महिन्यांपासून दीड हजार रुपयांचा हफ्ता बंद झाल्यामुळे असंख्य लाडक्या बहिणी संतप्त झाल्या आहेत. याविषयी आता राज्यमंत्री पंकज भोयर यांनी महत्त्वपूर्ण माहिती दिली आहे. “लाडकी बहीण योजनेसाठी ई-केवायसीची प्रक्रिया करताना अनेकांकडून चुकीची माहिती भरली गेली, त्यामुळे काहींचे हफ्ते बंद झाले होते. ही चूक दुरुस्त करण्याच्या सूचना संबंधित विभागाला तातडीने दिल्या आहेत,” असं ते म्हणाले. त्याचसोबत ज्यांना लाडकी बहीण योजनेचा हफ्ता मिळालेला नाही, त्यांना तो लवकरच मिळेल, असं आश्वासन त्यांनी यावेळी दिलं आहे.

“लाडक्या बहिणींच्या थकलेल्या हफ्त्यांसंदर्भात तातडीने संबंधित (beloved)विभागासोबत बैठक घेतली. ई-केवायसीतील चूक दुरुस्त करण्याच्या सूचना त्यांना दिल्या आहेत. लाडक्या बहिणींनी त्यांच्या ग्रामपंचायतीच्या अंगणवाडी सेविकांजवळ किंवा शहरातल्या लाडक्या बहिणींनी आपल्या भागातल्या अंगणवाडी सेविकांजवळ आधार कार्डची झेरॉक्स, संपर्क क्रमांक द्यायचा आहे. पुन्हा एकदा क्रॉस व्हेरिफिकेशन करून लाडक्या बहिणींचा हफ्ता पुन्हा सुरू करण्यात यावा, अशा सूचना प्रशासनाला देण्यात आल्या आहेत,” असं भोयर यांनी सांगितलं.लाडक्या बहिणींचा हफ्ता रखडल्यानंतर अनेकांनी जिल्ह्यातील महिला व बालविकास कार्यालयासमोर गर्दी केली होती, काहींनी तर ठिय्याच मांडला होता. अखेर याची दखल घेत महिला व बालविकास विभागाने मोठा निर्णय घेतला. राज्य शासनाच्या महिला व बालविकास विभागाच्या सचिवांनी राज्यातील सर्व महिला व बालविकास अधिकाऱ्यांची व्हिडीओ कॉन्फरन्सद्वारे बैठक घेतली. या बैठकीत त्यांनी ई-केवायसी भरताना चूक झालेल्या महिलांची अंगणवाडी सेविकांमार्फत पुन्हा व्हेरिफिकेशन करून त्यांना पूर्ववत लाभ देण्याचे स्पष्ट आदेश दिले होते. या निर्णयामुळे अनेक लाडक्या बहिणींना मोठा दिलासा मिळाला आहे.
ई-केवायसी भरताना चूक झाल्यास काय करावं?
लाडक्या बहिणींनी अंगणवाडी सेविकांजवळ आधार कार्डची झेरॉक्स आणि संपर्क क्रमांक जमा करावा.
त्यानंतर अंगणवाडी सेविकांकडून (beloved)त्याची पडताळणी केली जाईल.
पडताळणीनंतर लाडक्या बहिणींचा लाभ पूर्ववत होईल.
हेही वाचा :
स्मृती मंधानाच्या बालमित्राची पलाश मुच्छलकडून फसवणूक; सांगली पोलिसांत तक्रार दाखल
रात्री वायफाय चालू ठेवून झोपताय? आरोग्यासाठी आहे धोकादायक
कोल्हापुरात राजकीय हालचालींना वेग; राष्ट्रवादीची एकजूट आणि घड्याळ चिन्हावर निर्णायक लढत