वाहनचालकांसाठी अत्यंत महत्त्वाची बातमी आहे. आता मोटार वाहन (drivers) नियम कायद्यात सुधारणा केली आहे. अपघात कमी करण्यासाठी केंद्रीय मोटार वाहन नियम २०२६ मध्ये बदल केले आहेत. १ जानेवारीपासून या नवीन नियमांची अंबलबजावणी सुरु झाली आहे. हे नवीन नियम अधिक कडक झाले आहेत.मोटार वाहन नियम २०२६ नुसार एका वर्षात वाहनावर वाहतूक नियम मोडल्यास कडक कारवाई होणार आहे. जर तुम्ही पाचवेळी नियम मोडले तर कठोर कारवाई होणार आहे. वाहनांना फिटनेस प्रमाणपत्र, लोन, परमिट, एनओसी मिळणार नाहीये. याचसोबत तुम्हाला वाहन रिन्युअल आणि विकता येणार नाहीये.

वाहतूक नियम मोडल्यानंतर तीन दिवसांमध्ये ई-चलान पाठवले जाणार आहे. (drivers)यानंतर चालानावर आक्षेप घेण्यासाठी दंड भरण्यासाठी ४५ दिवसांची मुदत दिली जाणार आहे. याचसोबत ३० दिवसांची अतिरिक्त मुदत दिली जाणार आहे. दरम्यान, प्रलंबित दंड न भरल्यावर तुमचे वाहन परिवहन विभागाच्या पोर्टलवर ब्लॅकलिस्टमध्ये जाणार आहे.एका वर्षात एकाच वाहनचालकाने पाचवेळा नियम मोडल्यास त्यांना सराईत गुन्हेगार मानले जाते. त्यांच्यावर कारवाई होऊ शकते.
दुसरीकडे चालनवर आक्षेप घेतल्यानंतर अधिकाऱ्यांनी फेटाळल्यानंतर (drivers)वाहनधारकास न्यायालयात जाण्याचा अधिकारी आहे. त्यासाठी दंडाची ५० टक्के रक्कम भरावी लागणार आहे.नवीन केंद्रीय मोटार वाहन नियमात आता वाहनावर वर्षभरात पाचवेळी दंड झाला तर वाहन चालकांचा परवाना रद्द होऊ शकतो. दरम्यान, जोपर्यंत तुम्ही दंडाची रक्कम भरली नाही तर वाहनाची विक्री, नूतनीकरण, फिटनेस अशी कोणतीही कार्यवाही करता येणार नाही, असं विजय पाटील, सहायक प्रादेशिक परिवहन अधिकारी, सोलापूर यांनी सांगितले आहे.
हेही वाचा :
स्मृती मंधानाच्या बालमित्राची पलाश मुच्छलकडून फसवणूक; सांगली पोलिसांत तक्रार दाखल
रात्री वायफाय चालू ठेवून झोपताय? आरोग्यासाठी आहे धोकादायक
कोल्हापुरात राजकीय हालचालींना वेग; राष्ट्रवादीची एकजूट आणि घड्याळ चिन्हावर निर्णायक लढत