बँकेच्या ग्राहकांसाठी अत्यंत महत्त्वाची बातमी आहे. देशातील सर्व बँका (Banks) आजपासून बंद राहणार आहे. २४ ते २७ जानेवारी असे एकूण ४ दिवस बँका बंद असणार आहे. बँकांना सुट्ट्या असल्यामुळे तुमचे जर बँकेत काही काम असेल तर जाऊ नका. सुट्ट्यांची यादी पाहूनच बँकेत जा. दरम्यान, बँकांसोबतच शाळांनादेखील ३ दिवस सुट्टी असणार आहे. आज शनिवारी अनेक शाळांना सुट्टी असते. उद्या रविवार आणि सोमवारी प्रजासत्ताक दिनानिमित्त शाळांना सुट्टी असणार आहे.

देशात २४ आणि २५ जानेवारीला बँकांना शनिवार-रविवारी सुट्टी असणार आहे. (Banks)त्यानंतर २६ जानेवारीला प्रजासत्ताक दिनामुळे बँक बंद असणार आहे. २७ जानेवारीला बँकांचा संप असणार आहे. त्यामुळे सलग ४ दिवस बँका बंद असणार आहे.पाच दिवस काम करण्याबाबत निर्णय होत नाहीये, त्यामुळेच बँकांनी संप केला आहे. सलग बँका बंद असल्याने ग्राहकांवर त्याचा परिणाम होणार आहे.
२४ जानेवारी
बँकांना प्रत्येक महिन्याच्या दुसऱ्या आणि चौथ्या शनिवारी सुट्ट्या असतात. त्यामुळेच आज देशातील बँका बंद असणार आहेत.
२५ जानेवारी
२५ जानेवारीला रविवार आहे. त्यामुळे बँका बंद असणार आहे.
२६ जानेवारी
२६ जानेवारीला देशाचा प्रजासत्ताक दिन असणार आहे.(Banks) या दिवशी सरकारी सुट्टी असते. त्यामुळे बँकेच्या सर्व शाखा बंद असणार आहे.
२७ जानेवारी
२७ जानेवारीला बँका संप करणार आहेत. दर बँकांनी या दिवशी संप केला तर बँका बंद असणार आहेत.
या सेवा राहणार सुरु
बँक बंद असणार असल्या तरीही ऑनलाइन सर्व्हिस सुरु असणार आहे. तुमचे एटीएम, यूपीआय, मोबाईल बँकिंग या सुविधा सुरुच असणार आहेत. या दिवशी चेक क्लिअरन्स, ड्राफ्ट, कॅश काउंटर आणि ब्रँचमध्ये जी कामे होणार आहेत ती होणार नाहीत.
हेही वाचा :
स्मृती मंधानाच्या बालमित्राची पलाश मुच्छलकडून फसवणूक; सांगली पोलिसांत तक्रार दाखल
रात्री वायफाय चालू ठेवून झोपताय? आरोग्यासाठी आहे धोकादायक
कोल्हापुरात राजकीय हालचालींना वेग; राष्ट्रवादीची एकजूट आणि घड्याळ चिन्हावर निर्णायक लढत