आयपीएलच्या 19 व्या मोसमाचा थरार 28 मार्चपासून सुरुवात होणार आहे. (19th season) एका ट्रॉफीसाठी 10 संघांमध्ये चुरस असणार आहे. सर्व संघ या 19 व्या तयारीला लागले आहेत. या निमित्ताने स्पर्धेत कोणत्याही एका संघाविरुद्ध मॅन ऑफ द मॅच पुरस्कार न जिंकता सर्वाधिक सामने खेळणाऱ्या खेळाडूंबाबत आपण जाणून घेऊयात.

आर अश्विन याने मुंबई इंडियन्स विरुद्ध (19th season) सर्वाधिक 37 सामने खेळले आहेत.अश्विनला पलटण विरुद्ध 37 सामने खेळल्यानंतर एकदाही सामनावीर पुरस्कार जिंकता आलेला नाही. तर दिनेश कार्तिक याने चेन्नई सुपर किंग्स विरुद्ध 33 सामने खेळले आहेत. मात्र कार्तिकला या 33 पैकी एकाही मॅचमध्ये मॅन ऑफ द मॅच पुरस्कार जिंकता आलेला नाही.
रॉबिन उथप्पा याने दिल्ली कॅपिट्ल्स (19th season) विरुद्ध सर्वाधिक 28 सामने खेळले आहेत. उथप्पाला या 28 पैकी एकाही सामन्यात सामनावीर पुरस्कार जिंकता आला नाही. तर यूसुफ पठाण याने पंजाब विरुद्ध सर्वाधिक 24 सामने खेळले. मात्र युसूफलाही हा पुरस्कार जिंकण्यासारखी कामगिरी करता आली नाही.
दिनेश कार्तिक याला आरसीबी विरुद्ध सर्वाधिक 28 सामने खेळूनही एकदाही मॅन ऑफ द मॅच पुरस्काराचा मानकरी होता आलं नाहीय. तर विराट कोहली याने राजस्थान रॉयल्स विरुद्ध 33 सामने खेळलेत. मात्र विराटलाही राजस्थान विरुद्ध मॅन ऑफ द मॅच पुरस्कार जिंकता आला नाही.
ऑलराउंडर सुनील नारायण याने सनरायजर्स हैदराबाद विरुद्ध 27 सामने खेळले (19th season) आहेत. तर भुवनेश्वर कुमार याने कोलकाता नाईट रायडर्स विरुद्ध सर्वाधिक 30 सामने खेळलेत. मात्र दोघांनाही या संघाविरुद्ध मॅचविनिंग खेळी साकारुन सामनावीर पुरस्कार जिंकता आलेला नाही.
ऑलराउंडर हार्दिक पंड्या एलएसजी अर्थात लखनौ सुपर जायंट्स विरुद्ध मॅन ऑफ द मॅच पुरस्कार न जिंकता सर्वाधिक 8 सामने खेळला आहे. तर ट्रेन्ट बोल्ट याला गुजरात टायटन्स विरुद्ध 8 सामने खेळूनही सामनावीर होता आलं नाही.
हेही वाचा :
धक्कादायक, लग्नास नकार दिल्याने तरुणीला एचआयव्हीचे इंजेक्शन दिले
भर उन्हाळ्यात कोल्हापुरात अवकाळी पाऊस; गारपीटीमुळे नुकसानाची शक्यता
संपूर्ण जग भीषण इंधन टंचाईत अडकलं, पण भारतानं करून दाखवलं, 7 सर्वात मोठ्या गुड न्यूज