Forbes ने जाहीर केलेल्या “World’s Billionaires 2026” यादीत भारताने (World’s Billionaires) यंदा दमदार कामगिरी करत नवा विक्रम नोंदवला आहे. देशातील अब्जाधीशांची संख्या गेल्या वर्षीच्या 205 वरून वाढून थेट 229 वर पोहोचली असून 24 नव्या उद्योजकांनी या प्रतिष्ठित यादीत स्थान मिळवलं आहे. शेअर बाजारातील वाढ, नव्या कंपन्यांची लिस्टिंग आणि विविध क्षेत्रांतील गुंतवणूक यामुळे भारतीय अर्थव्यवस्थेची ताकद पुन्हा एकदा जगासमोर आली आहे.

या यादीत मुकेश अंबानी यांनी (World’s Billionaires) पुन्हा एकदा देशातील सर्वात श्रीमंत व्यक्ती म्हणून आपलं स्थान कायम ठेवलं आहे. Reliance Industries च्या नफ्यात झालेल्या वाढीमुळे त्यांची संपत्ती जवळपास 99.7 अब्ज डॉलरपर्यंत पोहोचली असून ते आशियातील प्रभावशाली उद्योगपतींपैकी एक मानले जात आहेत. त्यांच्या पाठोपाठ गौतम अदानी यांचा क्रमांक लागतो. अदानी समूहाच्या विस्तारामुळे त्यांच्या संपत्तीत मोठी वाढ झाली असून ती 63.8 अब्ज डॉलरपर्यंत पोहोचली आहे. गेल्या एका वर्षात या दोन्ही उद्योगपतींनी मिळून तब्बल 14.7 अब्ज डॉलरची वाढ नोंदवली आहे.

यंदाच्या यादीत महिलांनीही ठसा उमटवला आहे. सावित्री जिंदल या भारतातील (World’s Billionaires) तिसऱ्या सर्वात श्रीमंत व्यक्ती ठरल्या असून त्यांनी उद्योग क्षेत्रात प्रभावी नेतृत्व दाखवले आहे. त्यांच्या नेतृत्वाखालील समूहाने मोठी झेप घेतली असून त्यांची संपत्ती 31 अब्ज डॉलरवर पोहोचली आहे. त्यांनी लक्ष्मी मित्तल यांनाही मागे टाकले आहे. यंदा देशातील सुमारे 20 महिला अब्जाधीशांनी विविध क्षेत्रांत उल्लेखनीय कामगिरी करत उद्योगविश्वात आपली मजबूत ओळख निर्माण केली आहे.

या यादीत शिव नादर, सायरस पूनावाला, (World’s Billionaires) दिलीप सांघवी, कुमार बिर्ला, राधाकिशन दमानी आणि उदय कोटक यांसारख्या दिग्गजांनीही आपले स्थान कायम ठेवत भारताची आर्थिक ताकद अधोरेखित केली आहे.एकूणच, 2026 मध्ये भारताने अब्जाधीशांच्या संख्येत आणि संपत्तीत मोठी झेप घेत जागतिक स्तरावर आपली आर्थिक उपस्थिती अधिक मजबूत केली आहे. उद्योग, गुंतवणूक आणि नव्या संधींच्या जोरावर भारताचा आर्थिक प्रवास आणखी वेगाने पुढे जाणार असल्याचे या यादीतून स्पष्ट होते.

हेही वाचा :

ATM चा महत्त्वाचा नियम बदलला, पैसे काढताना खिशाला बसणार मोठी झळ; नवा नियम काय?

IPL 2026 स्पर्धेपूर्वीच चेन्नई सुपर किंग्सचं टेन्शन वाढलं, झालं असं की…

गुढीपाडव्याच्या दिवशीच शेअर बाजार कोसळला; ११.५ लाख कोटींचा चुराडा, २१ महिन्यांतील सर्वात मोठी घसरण

By admin

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *