मध्यपूर्वेत सुरू असलेल्या तणावपूर्ण परिस्थितीचा परिणाम आता हवाई प्रवासावरही दिसू (ongoing tension) लागला आहे. इराण आणि इस्राईल यांच्यातील संघर्ष अधिक तीव्र होत असताना अमेरिका देखील या घडामोडींमध्ये सक्रिय भूमिका बजावत आहे. २८ फेब्रुवारी रोजी झालेल्या मोठ्या हल्ल्यानंतर परिस्थिती आणखी चिघळली असून, त्यानंतर इराणकडून आखाती प्रदेशातील अमेरिकन तळांना लक्ष्य केले जात असल्याची माहिती समोर आली आहे. या संघर्षाचा आज २१वा दिवस असून, प्रदेशातील अस्थिरता कायम आहे.

या पार्श्वभूमीवर भारताच्या Directorate General of Civil Aviation (DGCA) ने भारतीय विमान कंपन्यांसाठी महत्त्वाची सुरक्षा सूचना जारी केली आहे. मध्यपूर्व आणि पर्शियन गल्फ परिसरातील हवाई क्षेत्र सध्या अत्यंत संवेदनशील बनले असून, या भागातून उड्डाण करताना मोठ्या प्रमाणावर धोका संभवतो, असा इशारा देण्यात आला आहे. वाढत्या लष्करी कारवाया, क्षेपणास्त्रांची हालचाल आणि एअर डिफेन्स सिस्टीम्समुळे नागरी विमानांना अप्रत्यक्ष धोका निर्माण होऊ शकतो, असे DGCA ने स्पष्ट केले आहे.
विशेषतः या भागात क्रूझ मिसाईल, बॅलेस्टिक (ongoing tension) मिसाईल आणि विविध उंचीवर कार्यरत एअर डिफेन्स सिस्टीम्स सक्रिय आहेत. अशा परिस्थितीत कोणतीही चुकीची ओळख किंवा ऑपरेशनल त्रुटी घडल्यास नागरी विमानांना लक्ष्य समजून कारवाई होण्याचा धोका नाकारता येत नाही. त्यामुळे भारतीय एअरलाईन्सना अत्यंत सावधगिरी बाळगण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत.
दरम्यान, DGCA ही भारतातील नागरी विमान वाहतुकीवर नियंत्रण ठेवणारी (ongoing tension) प्रमुख संस्था असून, ती Ministry of Civil Aviation अंतर्गत कार्यरत आहे. हवाई सुरक्षेचे मानदंड निश्चित करणे, विमान कंपन्यांवर देखरेख ठेवणे आणि प्रवाशांच्या सुरक्षिततेची खात्री करणे हे तिचे प्रमुख कार्य आहे. सध्याच्या तणावपूर्ण परिस्थितीत, प्रवाशांच्या सुरक्षिततेला प्राधान्य देत DGCA ने हा इशारा जारी केल्याचे स्पष्ट होत आहे.
हेही वाचा :
ATM चा महत्त्वाचा नियम बदलला, पैसे काढताना खिशाला बसणार मोठी झळ; नवा नियम काय?
IPL 2026 स्पर्धेपूर्वीच चेन्नई सुपर किंग्सचं टेन्शन वाढलं, झालं असं की…
गुढीपाडव्याच्या दिवशीच शेअर बाजार कोसळला; ११.५ लाख कोटींचा चुराडा, २१ महिन्यांतील सर्वात मोठी घसरण