आयपीएलच्या 19 व्या पर्वाची चाहूल लागलेली असताना मागील (19th season of IPL) हंगामांची आकडेवारी पुन्हा चर्चेत आली आहे. 18 पर्व पूर्ण झालेल्या या स्पर्धेत आतापर्यंत अनेक गोलंदाजांनी आपली छाप सोडली असली, तरी काही दिग्गजांना पर्पल कॅपसारखा मान मात्र हुलकावणी देत राहिला आहे. एका हंगामात सर्वाधिक विकेट घेणाऱ्या गोलंदाजाला मिळणाऱ्या या प्रतिष्ठेच्या किताबापासून अनेक मोठी नावं आजही दूर आहेत, ही बाब विशेष लक्षवेधी ठरते.

Jasprit Bumrah हा जगातील (19th season of IPL) सर्वोत्तम वेगवान गोलंदाजांपैकी एक मानला जातो. आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये त्याने अनेक सामने आपल्या बॉलिंगने जिंकून दिले आहेत. टी20 वर्ल्डकप 2024 आणि 2026 मधील भारताच्या विजयानंतर त्याच्या कामगिरीचं मोठं कौतुक झालं. आयपीएलमध्येही त्याने 183 विकेट्स घेत प्रभाव टाकला आहे. मात्र इतक्या सातत्यपूर्ण आणि प्रभावी कामगिरीनंतरही त्याला एकदाही पर्पल कॅप जिंकता आलेली नाही.
Ravichandran Ashwin याने आपल्या कारकिर्दीत अनेकदा संघाला (19th season of IPL) अडचणीतून बाहेर काढलं. त्याच्या बुद्धिमान गोलंदाजीमुळे तो जगभरात ओळखला गेला. आयपीएलमधील 16 हंगामांमध्ये त्याने 187 विकेट्स घेतल्या, पण पर्पल कॅप त्याच्या नावावर कधीच आली नाही. आता निवृत्तीनंतरही ही बाब त्याच्या कारकिर्दीत एक अपूर्ण गोष्ट म्हणून राहिली आहे.
Sunil Narine गेल्या अनेक वर्षांपासून कोलकाता नाईट रायडर्सचा कणा राहिला आहे. त्याच्या मिस्ट्री स्पिनमुळे अनेक फलंदाज गोंधळले. 189 सामन्यांमध्ये 192 विकेट्स आणि 8 पेक्षा कमी इकॉनॉमी रेट ही त्याच्या सातत्याची साक्ष देतात. तरीही पर्पल कॅप त्याच्या झोळीत कधी पडली नाही.
Piyush Chawla हा आयपीएलमधील अनुभवी फिरकीपटूंपैकी एक. 192 सामन्यांत 192 विकेट्स घेणाऱ्या चावलाने अनेक हंगामात प्रभावी कामगिरी केली. 2023 मध्ये 20 पेक्षा जास्त विकेट्स घेतल्यानंतरही त्याला पर्पल कॅप मिळू शकली नाही. 2025 नंतर निवृत्त झाल्यानंतर त्याची ही खंत कायम राहिली.
Rashid Khan हा आधुनिक क्रिकेटमधील सर्वात (19th season of IPL) धोकादायक फिरकीपटू मानला जातो. आयपीएलमध्ये 158 विकेट्स घेत त्याने सातत्याने चांगली कामगिरी केली आहे. गेल्या काही हंगामांत 20 पेक्षा जास्त विकेट्स घेऊनही तो पर्पल कॅपपासून दूर राहिला. 2023 मध्ये 27 विकेट्स घेऊनही त्याला हा किताब मिळाला नाही, ही बाब अनेकांना आश्चर्यचकित करणारी ठरली.
आयपीएलसारख्या स्पर्धेत सातत्य, फॉर्म आणि थोडं नशीब या सगळ्यांचा मेळ लागल्यानंतरच पर्पल कॅप मिळते. त्यामुळे मोठी कामगिरी करूनही काही दिग्गज गोलंदाज या यादीतून वंचित राहिले आहेत. 19 व्या हंगामात ही चित्र बदलतं का, याकडे आता सर्व क्रिकेटप्रेमींचं लक्ष लागलेलं आहे.
हेही वाचा :
ATM चा महत्त्वाचा नियम बदलला, पैसे काढताना खिशाला बसणार मोठी झळ; नवा नियम काय?
IPL 2026 स्पर्धेपूर्वीच चेन्नई सुपर किंग्सचं टेन्शन वाढलं, झालं असं की…
गुढीपाडव्याच्या दिवशीच शेअर बाजार कोसळला; ११.५ लाख कोटींचा चुराडा, २१ महिन्यांतील सर्वात मोठी घसरण