कोल्हापूर/ विशेष प्रतिनिधी
नाशिक म्हणजे महाराष्ट्रातील तीर्थक्षेत्राचा दर्जा असलेला जिल्हा. हजारो (pilgrimage center) भाविक नाशिक मध्ये येत असतात. तेथील नदीच्या काठावर अनेक जण कर्मकांड करत असतात. याच जिल्ह्यातील सिन्नर तालुक्यात मिरगाव येथे”शिवनीका”नावाचे अध्यात्मिक संस्थान आहे.
या संस्थानात गेल्या अनेक वर्षांपासून अंधश्रद्धेचा घाऊक बाजार भरलेला असतो. या बाजारात काही समस्या घेऊन आलेल्या स्त्रियांचे लैंगिक शोषण केले जात होते आणि एका पीडित स्त्रीनेच त्याविरुद्ध आवाज उठवल्यामुळे कॅप्टन अशोक एकनाथ खरात या वलयांकित भोंदू बाबाला नाशिकच्या सरकार वाडा पोलिसांनी अटक केली आहे.या स्वयंघोषित कॅप्टनचे संस्थान म्हणजे एक प्रकारची
एप्सटीन फाईल असून आता
व्यापक तपासासाठी एस.आय.टी. स्थापन करण्यात आली आहे. या प्रकरणाचा अगदी काटेकोरपणे तपास झाला
तर अनेक सेलिब्रेटीज च्या
अंधश्रद्धा सर्वसामान्य जनतेसमोर येणार आहेत.

अशोक खरात हा सांगतो की, (pilgrimage center) मी मर्चंट नेव्ही मध्ये कॅप्टन होतो. मी 154 देश फिरलेलो आहे. आता त्याचाही तपास होईल. या भोंदू बाबाच्या संस्थानच्या कार्यकारी मंडळामध्ये महाराष्ट्र राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षा रूपाली चाकणकर या असल्यामुळे
हे प्रकरण अतिशय खळबळ जनक ठरले आहे. त्यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिला पाहिजे अशी मागणी त्यांच्याच राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्या रूपाली ठोंबरे तसेच ठाकरे गटाच्या सुषमा अंधारे
यांनी केली आहे. नाशिक कुंभमेळ्याच्या पार्श्वभूमीवर
उघडकीस आलेल्या या प्रकरणाची मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी गांभीर्याने दखल घेतलेली आहे. आणि म्हणूनच एस आय टी नेमण्याची घोषणा त्यांनी केली आहे.
या “संस्थान “मध्ये तथाकथित कॅप्टन अशोक खरात याचा दरबार भरत असे. या दरबारात प्रवेश मिळावा म्हणून आधी दोन-तीन महिने अनेकांना
प्रयत्न करावे लागत असत.
या दरबारात नगरसेवक, जिल्हा परिषद सदस्य, स्थानिक (pilgrimage center) स्वराज्य संस्थांचे पदाधिकारी, आमदार, मंत्री,
बडे राजकीय नेते यांची वर्दळ असे. या भोंदू बाबाच्या दरबारात बड्या हस्ती येत असतात म्हणून हा दरबार वलयांकित बनला होता.
अशोक खरात हा अंक शास्त्राच्या माध्यमातून लोकांना भविष्य सांगत असे.
याशिवाय वशीकरण, अपत्य प्राप्ती, व्यवसायात बरकत,
नोकरी, छोकरी, व्यक्तिगत संकट निवारण, राजकीय भरभराट, आणि त्यासाठी मंत्र तंत्र, करणी धरणी, असे अनेकविध प्रकार त्याच्याकडून केले जात असत.
स्त्रियांमधील धार्मिकता, अंधश्रद्धा याचा गैरफायदा तो घ्यायचा. स्त्रियांचे लैंगिक शोषण, आर्थिक शोषण, मानसिक शोषण, असे धंदे त्याचे चालायचे. भीती दाखवून, प्रलोभन दाखवून तो स्त्रियांशी शारीरिक संबंध
प्रस्थापित करायचा. त्यातीलच एका महिलेने धाडस दाखवून कॅप्टन अशोक खरात या लिंग पिसाट विरोधात सरकार वाडा पोलीस ठाण्यात तक्रार केल्यानंतर आणि पोलिसांनी गुन्हा दाखल करून त्याला अटक केल्यानंतर राजकारणात मोठी खळबळ उडाली.
त्याच्याकडून जप्त (pilgrimage center) करण्यात आलेल्या पेन ड्राईव्ह मध्ये जवळपास 58 व्हिडिओ आहेत. त्यातील अनेक व्हिडिओ हे अश्लील आहेत. त्याच्या दरबारात
महाराष्ट्र राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षा रूपाली चाकणकर या भोंदू बाबा चे पाय धूत असल्याचा एक व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर अनेकांना धक्का बसणे स्वाभाविक होते. आता त्यांनी याबद्दल खुलासा केला असला तरी
त्या या भोंदू बाबाच्या आध्यात्मिक संस्थेच्या कार्यकारी मंडळात होत्या हे भयानक आहे. त्याबद्दल मात्र त्यांनी काही खुलासा केलेला दिसत नाही. आपण ज्या संस्थेच्या कार्यकारी मंडळात आहोत त्या मंडळाचा सर्वेसर्वा असलेला अशोक खरात हा स्त्रियांचे लैंगिक शोषण करत होता. हे त्यांना आता उशीराने कळाले आहे असे गृहीत धरले तरी त्या महिला आयोगाच्या अध्यक्षा आहेत, आणि त्यांच्याच पदाचा गैरफायदा खरात घेत होता हे अतिशय गंभीर आहे.
राज्यातील महिलांची प्रतिष्ठा (pilgrimage center) जपण्याची, त्यांचे हक्क अबाधित ठेवण्याची,
दुनियांवर होत असलेल्या अत्याचाराबद्दल कठोर भूमिका घेण्याची जबाबदारी महिला आयोगाच्या अध्यक्षा म्हणून रूपाली चाकणकर यांच्यावर आहे. आणि म्हणूनच त्यांनी या प्रकरणाची नैतिक जबाबदारी स्वीकारून आपल्या पदाचा राजीनामा देणे आवश्यक आहे. यापूर्वी वैष्णवी हगवणे, स्मिता भिसे, संपदा मुंडे प्रकरणात रूपाली चाकणकर यांची भूमिका समस्यास्पद राहिलेली आहे.
या तथाकथित भोंदू बाबाची भेट मिळावी म्हणून
आधी दोन-तीन महिन्यांपासून प्रयत्न करावे लागत असत. त्याच्या दरबारात कायम गर्दी असे.
विशेषतः महिलांची गर्दी लक्षणीय असे. स्त्रियांच्या धार्मिक मानसिकतेचा,
त्यांच्यातील अंधश्रद्धेचा
हा अशोक खरात लैंगिक शोषण करण्यासाठी फायदा घ्यायचा हे आता एका पीडित महिलेने फिर्याद दिल्यानंतर स्पष्ट झाले आहे. आता त्याच्याविरुद्ध फिर्याद देण्यासाठी मोठ्या संख्येने महिला पुढे येतील. अंधश्रद्धे विरुद्ध कायदा करणारे महाराष्ट्र हे देशातील पहिले राज्य आहे आणि या राज्यातच काही वलयांकित भोंदू बाबांकडून अंधश्रद्धेचा घाऊक बाजार भरवला जातो ही शाहू फुले आंबेडकर यांच्या महाराष्ट्राची शोकांतिका म्हणावी लागेल.
हेही वाचा :
ATM चा महत्त्वाचा नियम बदलला, पैसे काढताना खिशाला बसणार मोठी झळ; नवा नियम काय?
IPL 2026 स्पर्धेपूर्वीच चेन्नई सुपर किंग्सचं टेन्शन वाढलं, झालं असं की…
गुढीपाडव्याच्या दिवशीच शेअर बाजार कोसळला; ११.५ लाख कोटींचा चुराडा, २१ महिन्यांतील सर्वात मोठी घसरण