Indian Premier League च्या 19 व्या हंगामाला सुरुवात होण्यापूर्वीच (19th season) अनेक संघांना दुखापतींचा फटका बसत असल्याचं चित्र समोर येत आहे. एकामागोमाग एक खेळाडू स्पर्धेबाहेर होत असल्यामुळे संघ व्यवस्थापनाची चिंता वाढली आहे.Sunrisers Hyderabad ला आता आणखी एक मोठा धक्का बसला आहे. संघाचा 25 वर्षीय वेगवान गोलंदाज Jack Edwards दुखापतीमुळे संपूर्ण स्पर्धेतून बाहेर झाला आहे. उपलब्ध माहितीनुसार, त्याची दुखापत गंभीर असून स्पर्धा सुरू होईपर्यंत तो पूर्णपणे फिट होण्याची शक्यता कमी मानली जात आहे. त्यामुळे संघाच्या गोलंदाजी आघाडीवर मोठा परिणाम होणार आहे.

गेल्या हंगामात एडवर्ड्सवर (19th season) सनरायजर्स हैदराबादने मोठी गुंतवणूक केली होती. त्याची बेस प्राईज 50 लाख रुपये असताना फ्रँचायझीने त्याच्यासाठी तब्बल 3 कोटी रुपये मोजले होते. त्यामुळे त्याच्याकडून संघाला मोठ्या अपेक्षा होत्या, मात्र दुखापतीमुळे त्या पूर्ण होऊ शकणार नाहीत.दरम्यान, संघाचा कर्णधार Pat Cummins हाही दुखापतीमुळे सुरुवातीच्या काही सामन्यांना मुकणार असल्याचं स्पष्ट झालं आहे. त्यामुळे संघाच्या रणनितीवर याचा थेट परिणाम होण्याची शक्यता आहे.
याचदरम्यान इतर संघांनाही अशाच समस्यांना सामोरं (19th season) जावं लागत आहे. Chennai Super Kingsचा वेगवान गोलंदाज Nathan Ellis आणि Rajasthan Royalsचा अष्टपैलू Sam Curran हे देखील दुखापतीमुळे स्पर्धेतून बाहेर झाले आहेत.स्पर्धा सुरू होण्याआधीच प्रमुख गोलंदाज बाहेर पडत असल्यामुळे अनेक संघांना आपली अंतिम प्लेइंग इलेव्हन आणि संयोजन पुन्हा आखावं लागत आहे. त्यामुळे यंदाचा हंगाम अधिक अनिश्चित आणि चुरशीचा होण्याची शक्यता वर्तवली जात आहे.
हेही वाचा :
ATM चा महत्त्वाचा नियम बदलला, पैसे काढताना खिशाला बसणार मोठी झळ; नवा नियम काय?
IPL 2026 स्पर्धेपूर्वीच चेन्नई सुपर किंग्सचं टेन्शन वाढलं, झालं असं की…
गुढीपाडव्याच्या दिवशीच शेअर बाजार कोसळला; ११.५ लाख कोटींचा चुराडा, २१ महिन्यांतील सर्वात मोठी घसरण