रस्त्यावरची कोणतीही वस्तू घेताना अनेकदा विचार करायला हवं.(fruits)रस्त्यावरचे खाद्यपदार्थ खाणे हे शरीरासाठी चांगले नसते. त्यानंतर आता रस्त्यावरुन भाजी किंवा फळे घेणेदेखील धोक्याचे असल्याचे समोर आले आहे. रस्त्यावरील फेरीवाल्यांकडून जर तुम्ही कोणतीही फळे घेत असाल तर ही बातमी खास तुमच्यासाठी. एका फळविक्रेत्याचा किळसवाणा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.सोशल मीडियावर व्हायरल होत असलेल्या व्हिडिओत फळविक्रेत्या चक्क गटाराच्या पाण्यात फळं धुताना दिसत आहे. गटाराचे ओहरफुल होऊन बाहेर आलेले पाणी सफरचंद, डाळिंब आणि द्राक्षांवर टाकून विकत आहेत. हा धक्कादायक प्रकार एका ग्राहकाने उघडकीस आली आहे.

विरारच्या ग्लोबल सिटी नाक्यावर काल दुपारी तीनच्या सुमारास ही घटना घडली आहे..(fruits) परिसरातील नागरिक विश्वनाथ शेट्टी यांच्या ही घटना लक्षात आल्यावर त्यांनी या फेरीवाल्याचा व्हिडिओ काढला आहे. शेट्टी यांनी याबाबत 112 वर कॉल करून याची माहिती पोलिसांना दिली. फुड अँड ड्रग्स विभागालाही कळवले. सदर घटनेची माहिती मिळाल्यानंतरही त्यांच्याकडून कार्यवाही करण्यास उडवाउडवीची उत्तर मिळाले असल्याचे शेट्टी यांनी सांगितले. सध्या हा व्हिडिओ सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल होत असून नागरिकांकडून तीव्र संताप व्यक्त होत आहे.
रस्त्यावरुन कोणतीही वस्तू घेताना विचार करावा. काही .(fruits)दिवसांपूर्वीही असाच एक व्हिडिओ व्हायरल झाला होता. त्यामध्ये एक भाजीविक्रेता गटारातील पाण्याने भाजी साफ करताना दिसत होता. या अशा गोष्टींमुळे तुमच्या शरीरावर परिणाम होतो. गटाराच्या पाण्याने धुतलेली भाजी किंवा फळे तुम्ही खालल्याने तुम्ही आजारी पडू शकता. फळविक्रेत्याच्या एका चुकीमुळे थेट तुमच्यावर परिणाम होतो.
हेही वाचा :
आधावरचा पत्ता नाव किंवा ई-मेल चुकलाय? हे App डाउनलोड करा अन् मिनिटांत चुका करा
अजित पवार यांच्या आठवणीत मुलगा जय पवार भावूक; सोशल मीडियावर व्यक्त केल्या भावना
‘या’ जन्मतारखेला जन्मलेली लोक प्रचंड नशीबवान असतात; गुरू ग्रहाची असते मोठी