उत्तर प्रदेशातील कानपूरमध्ये एका तरुणाने येणाऱ्या जाणाऱ्या (young)महिलांचा विनयभंग आणि छेड काढल्याप्रकरणी घरात जाऊन चोप दिला. या घटनेचा व्हिडिओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणावर व्हायरल होत आहे. यानंतर नागरिकांनी तरुणाला पोलिसांच्या ताब्यात दिले असून पोलीस ठाण्यात तरुणा विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलीस या प्रकरणी तपास करत आहेत.

दैनिक भास्करने दिलेल्या वृत्तानुसार , सदर घटना कानपुर शहरातील (young)जारौली गावातील बिहारी पुरवा येथे घडली आहे. ९ मार्च रोजी दुपारी १:३० वाजता एक तरुणी कामासाठी घरातून बाहेर पडली असता शेजारी राहणाऱ्या तरुणाने तिचा विनयभंग केला. संतापलेली तरुणी तरुणाच्या अंगावर धावून केली.काही क्षणातच तिथे आजूबाजूने नागरिक जमा झाले. इतर महिलांनी सुद्धा तरुणाच्या कृत्याबाबत तक्रार करत त्याच्या घरी जाऊन त्याला चोप दिला. यानंतर काही तरुणांनी महिलांना शांत करत आरोपीला पोलिसांच्या स्वाधीन केले. या घटनेचा व्हिडिओ देखील व्हायरल होत आहे.
#DalitLivesMatter #Casteism
— VijayBabu(@Vijay_luffy943) March 17, 2026
A molester was publicly beaten in Kanpur.
In Kanpur's Jarauli village, Vikas Pandit, a young man who had been repeatedly harassing women, was caught and severely beaten by local women. A video of this went viral. It is alleged that he had been lewdly… pic.twitter.com/ygzvS4dKsa
व्हायरल झालेल्या व्हिडिओमध्ये ५ ते ६ महिला संबंधित आरोपीला चोप (young)देताना पाहायला मिळत आहे. एक महिलेने आरोपीला शिवीगाळ करत त्याला चपलेने मारलं तर दुसऱ्या महिलेने थेट फावडा आणून आरोपीवर हल्ला केला. तसेच इतर महिला त्याला हाताने हाणामारी करत होत्या. याप्रकरणी पोलीस ठाण्यात आरोपी विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलीस या घटनेचा सखोल तपास करत आहेत.
हेही वाचा :
धक्कादायक, लग्नास नकार दिल्याने तरुणीला एचआयव्हीचे इंजेक्शन दिले
भर उन्हाळ्यात कोल्हापुरात अवकाळी पाऊस; गारपीटीमुळे नुकसानाची शक्यता
संपूर्ण जग भीषण इंधन टंचाईत अडकलं, पण भारतानं करून दाखवलं, 7 सर्वात मोठ्या गुड न्यूज