सध्या लहानांपासून मोठ्यांपर्यंत वेबसिरीज पाहण्याचं वेड प्रचंड वाढलं आहे.(phones) नेटफ्लिक्स, MX प्लेअर, झी5 यांसारख्या ओटीटी प्लॅटफॉर्म्समुळे मनोरंजन अगदी मोबाईलच्या एका क्लिकवर उपलब्ध झालं आहे. मात्र याच सोयीसोबत पालकांसमोर एक गंभीर प्रश्न उभा राहतोय, तो म्हणजे आपली मुलं मोबाईलवर नेमकं काय पाहत आहेत? कुठे त्यांना अयोग्य किंवा Adult Content तर दिसत नाही ना, अशी शंका अनेक पालकांच्या मनात असते. त्यामुळे काही पालक सतत मुलांवर लक्ष ठेवतात, पण यामुळे मुलं नाराज होण्याची शक्यता देखील वाढते.तज्ज्ञांच्या मते, पालक नियंत्रण म्हणजे कठोर नियम लादणं नव्हे, तर विश्वास आणि संवाद यावर आधारित मार्गदर्शन असायला हवं. आज अनेक ओटीटी प्लॅटफॉर्म्स पालकांसाठी खास फीचर्स देतात, ज्याचा योग्य वापर केल्यास मुलांचं डिजिटल जग अधिक सुरक्षित बनवता येऊ शकतं. उदाहरणार्थ, नेटफ्लिक्सवर वयानुसार प्रोफाइल तयार करता येतात. यामुळे मुलांना त्यांच्यासाठी योग्य असलेलीच सामग्री पाहायला मिळते आणि त्यांना स्वतःची स्वतंत्र जागा मिळाल्याची भावना निर्माण होते.

याशिवाय, प्रौढांसाठी असलेले प्रोफाइल पिनने लॉक करता येतात.(phones) यामुळे लहान मुलं चुकूनही प्रौढांसाठी असलेला कंटेंट पाहू शकत नाहीत किंवा नवीन प्रोफाइल तयार करू शकत नाहीत. हे एक सोपं पण प्रभावी संरक्षण मानलं जातं. पालक नियंत्रणामध्ये केवळ काय पाहायचं यावरच नाही, तर किती वेळ पाहायचं यावरही लक्ष दिलं जातं. स्क्रीन टाइम मर्यादित ठेवण्यासाठी ऑटोप्ले बंद करण्यासारखे पर्याय उपलब्ध आहेत. तसेच, मुलांनी काय पाहिलं याचा इतिहास पालक पाहू शकतात, ज्यामुळे सतत तपासणी करण्याची गरज कमी होते.मुले स्वभावतःच उत्सुक असतात आणि त्यांची ही कुतूहल सुरक्षितपणे जपणं महत्त्वाचं असतं. किड्ससाठी डिझाइन केलेले व्ह्यूइंग पर्याय मुलांना त्यांच्या आवडीचे अॅनिमेशन, शैक्षणिक कथा किंवा मनोरंजनात्मक कार्यक्रम पाहण्याची मुभा देतात, मात्र ठरवलेल्या मर्यादांमध्ये. त्यामुळे पालकांनाही अधिक निश्चिंत वाटतं.
विशेष म्हणजे, अनेक शो आणि मालिका कुटुंबातील नातेसंबंध, (phones)भावना आणि समस्या सोडवण्यासारख्या विषयांवर संवाद घडवून आणतात. काही कार्यक्रम मुलांना स्क्रीनच्या बाहेरही सर्जनशील उपक्रमांकडे वळायला प्रेरित करतात. त्यामुळे स्क्रीन टाइम हा केवळ वेळ घालवण्याचा प्रकार न राहता, कुटुंबासाठी एकत्र शिकण्याची आणि अनुभव शेअर करण्याची संधी ठरतो.आजच्या डिजिटल युगात पालक नियंत्रण ही केवळ एक सुविधा नसून गरज बनली आहे. योग्य संवाद, विश्वास आणि तंत्रज्ञानाचा समतोल वापर केल्यास मुलांचं ऑनलाईन जग सुरक्षित, सकारात्मक आणि शिकवण देणारं बनवणं नक्कीच शक्य आहे.
हेही वाचा :
खुशखबर! आयकर विभागात नोकरीची संधी; पगार ८१,८०० रुपये; अर्ज कसा करावा?
सेमीफायनलमध्ये अफगाण शतकी जोडीचा धडाका! भारतासमोर 311 धावांचे तगडे लक्ष्य, फायनलची लढत रंगणार