आजच्या काळात महागाई वाढत असताना घरातील एलपीजी गॅस वाचवणे (cylinder)अत्यंत गरजेचे झाले आहे. साधारणपणे एका कुटुंबात गॅस सिलिंडर दोन ते तीन महिने आरामात चालतो.मात्र, अनेक वेळा काही लहान चुकांमुळे गॅसची नासाडी होते. त्यामुळे गॅस सिलेंडर वेळेआधीच संपतो. जर तुम्हालाही ही समस्या जाणवत असेल, तर खालील काही सोप्या ट्रिक्स वापरून तुम्ही गॅसची मोठी बचत करू शकता.गॅसच्या बर्नरमध्ये घाण किंवा कचरा साचल्यास त्याची छिद्र बंद होतात. परिणामी, गॅसची फ्लेम निळी न राहता पिवळी दिसू लागते. पिवळी फ्लेम म्हणजे गॅस वाया जात असल्याचे लक्षण असते. त्यामुळे बर्नर नेहमी स्वच्छ ठेवा जेणेकरून उष्णता योग्य मिळेल.अनेकजण घाईघाईत धुतलेली ओली भांडी थेट गॅसवर ठेवतात. भांड्यातील पाणी सुकवण्यासाठी गॅसची अधिक ऊर्जा खर्च होते. त्याऐवजी भांडी कापडाने पुसून कोरडी करून मगच वापरा.

फ्रीजमधून काढलेले दूध किंवा भाज्या अत्यंत थंड असतात. (cylinder) त्या थेट गॅसवर ठेवल्यास शिजण्यासाठी किंवा गरम होण्यासाठी दुप्पट गॅस लागतो. असे पदार्थ गरम करण्यापूर्वी किमान १५-२० मिनिटे बाहेर काढून सामान्य तापमानाला येऊ द्या.गॅस पेटवल्यानंतर फोडणीचे साहित्य शोधण्यापेक्षा, सर्व तयारी म्हणजे भाजी चिरणे, मसाला तयार ठेवणे हे आधीच करून ठेवा. यामुळे गॅस विनाकारण जळत नाही. स्वयंपाक करताना भांड्यावर नेहमी झाकण ठेवा. यामुळे वाफ आतच राहते आणि अन्न कमी वेळेत शिजते, ज्यामुळे गॅसची बचत होते.

डाळ किंवा तांदूळ शिजवण्यापूर्वी अर्धा तास पाण्यात भिजत घातल्यास ते मऊ होतात (cylinder)आणि खूप लवकर शिजतात. या छोट्या पण महत्त्वपूर्ण सवयी लावून घेतल्यास तुमच्या घरच्या बजेटवरचा ताण नक्कीच कमी होईल आणि गॅस सिलेंडर जास्त दिवस टिकण्यास मदत होईल.नेहमी बर्नरच्या आकारानुसार भांडी निवडा. लहान भांड्यासाठी मोठा बर्नर वापरल्यास ज्वाळा भांड्याच्या बाहेर जातात. त्यामुळे गॅस वाया जातो. शक्यतो पसरट भांड्यांचा वापर करा, ज्यामुळे उष्णता समान प्रमाणात लागते

हेही वाचा :

T20 World Cup 2026 : दुखापतीला आणखी 1 विकेट, मॅचविनर खेळाडू वर्ल्ड कप स्पर्धेतून आऊट

दमदार बॅटरी आणि 50MP कॅमेरा असलेला Samsung Galaxy F70e 5G हा स्मार्टफोन स्वस्तात झाला लाँच, जाणून घ्या किंमत

Jeffrey Epstein Files : जेफ्री एपस्टिनच्या रेड रुममध्ये काय घडायचं ? जगातील सर्वात सुंदर तरुणी…

By admin

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *