राज्यातील शिक्षकांसाठी अत्यंत महत्त्वाची बातमी आहे.(professor) राज्यात ५,५०० प्राध्यापक पदांसाठी भरती जाहीर करण्यात आली आहे. उच्च व तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांनी याबाबत घोषणा केली आहे.महात्मा एज्युकेशन सोसायटीच्या प्रवर्तनातून साकारलेल्या पिल्लई विद्यापीठ, नवी मुंबईचे भव्य आणि औपचारिक उद्घाटन महाराष्ट्राचे उच्च व तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांतदादा पाटील यांच्या हस्ते पार पडले. त्यावेळी त्यांनी याबाबत माहिती दिली.राज्यातील विद्यापीठे आणि महाविद्यालयांमधील रिक्त असलेल्या प्राध्यापकांच्या जागा भरण्याबाबत राज्य सरकारने एक महत्त्वाचा निर्णय घेतला आहे.

महाविद्यालयांमधील सुमारे ११ हजार रिक्त जागा रिक्त आहेत.(professor) यापैकी ५,५०० जागा भरण्यासाठी मंजुरी देण्यात आली आहे. आचारसंहिता संपताच ही प्रक्रिया वेगाने पूर्ण करण्यात आली आहे.७०० विद्यापीठांमधील प्राध्यापक भरती केली जाणाार आहे. केवळ महाविद्यालयेच नव्हे, तर विद्यापीठ कॅम्पसमध्येही ७०० प्राध्यापकांच्या भरतीचा मार्ग मोकळा झाला आहे.ृ ​या निर्णयामुळे गेल्या अनेक वर्षांपासून रखडलेली प्राध्यापक भरती आता सुरू होणार असून, यामुळे उच्च शिक्षणाच्या गुणवत्तेत सुधारणा होईल, अशी आशा व्यक्त केली जात आहे.

राज्यात लवकरच नोकरभरती होणार आहे. तब्बल ७० हजार (professor)पदांसाठी भरती करण्यात येणार आहे. महाराष्ट्र लोकसेवा आयोगाद्वारे २० हजार पदे भरली जाणार आहेत. राज्य शासनाच्या विविध विभागांमध्ये भरती केली जाणार आहे. यामुळे विभागाच्या कार्यक्षमतेत भर पडेल.यासंदर्भातील नियमावली सुधारणेसंदर्भात लवकरच निर्णय घेतला जाईल, याबाबत मुख्यमंत्र्यांनी माहिती दिली आहे.

हेही वाचा :

T20 World Cup 2026 : दुखापतीला आणखी 1 विकेट, मॅचविनर खेळाडू वर्ल्ड कप स्पर्धेतून आऊट

दमदार बॅटरी आणि 50MP कॅमेरा असलेला Samsung Galaxy F70e 5G हा स्मार्टफोन स्वस्तात झाला लाँच, जाणून घ्या किंमत

Jeffrey Epstein Files : जेफ्री एपस्टिनच्या रेड रुममध्ये काय घडायचं ? जगातील सर्वात सुंदर तरुणी…

By admin

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *