दक्षिण गोव्यातून एक अत्यंत(leader’s) गंभीर आणि खळबळजनक प्रकरण समोर आले आहे. एका भाजप नगरसेवकाच्या मुलाने २५ ते ३० अल्पवयीन मुलींचे लैंगिक शोषण करून, त्यांचे अश्लील व्हिडिओ बनवून त्यांना ब्लॅकमेल करण्यात आल्याचा धक्कादायक घटना घडली आहे. याप्रकरणी पोलिसांनी भाजप नगरसेवकांचे पुत्र सोहम नाईक याला पोलिसांनी बेड्या ठोकल्या आहेत. तसेच पुढील तपास सुरु आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, (leader’s) गेल्या तीन वर्षांपासून सोहम अल्पवयीन मुलींशी शारीरिक संबंध ठेवत होता. त्यांचे गुपचूप व्हिडिओ रेकॉर्ड करून पीडित मुलींना धमकावण्यासाठी आणि गप्प राहण्यास भाग पाडण्यासाठी या व्हिडिओंचा तो वापर करत होता. गेल्या आठवड्यात एका पार्टीदरम्यान, आरोपीने कथितरित्या हे व्हिडिओ त्याच्या मित्रांना दाखवून आपल्या कृत्यांबद्दल सांगितले, तेव्हा हे प्रकरण उघडकीस आले. त्यांनी आरोपींवर कठोर कारवाई करण्याची मागणी केली. दरम्यान, काहींनी या प्रकरणाचे राजकारण केले जात असल्याचा आणि त्याचा संबंध भाजपशी असल्याचा आरोप केला.
स्थानिक रहिवाशांनी पोलीस(leader’s) ठाण्याला घेराव घालून आरोपीच्या अटकेची मागणी केल्याने परिस्थिती चिघळली. स्थानिक नागरिकांच्या वाढत्या दबावाखाली पोलिसांनी कारवाई करत रविवारी रात्री सोहम नाईकला अटक केली.पोलिसांचे म्हणणे आहे की, तपास सुरू असून प्रकरणाच्या सर्व बाजूंनी कसून तपासणी केली जात आहे. या प्रकरणात आणखी कोणाचा सहभाग आहे का? हे शोधण्याचे प्रयत्नही सुरू आहेत. या घटनेनंतर संपूर्ण दक्षिण गोव्यात संतापाचे वातावरण पसरले आहे. पीडितांना न्याय मिळावा आणि आरोपींवर कठोर कारवाई व्हावी, अशी मागणी लोक करत आहेत.
