राज्यातील लाडक्या बहिणींना सरकारने मोठा दिलासा दिला आहे.(resumes) काही महिन्यांपूर्वी बंद केलेली लाभार्थी पडताळणी ‘ई-केवायसी’ प्रक्रिया पुन्हा सुरू करण्यात आली आहे. ही पडताळणी सुरू केल्याने महिलांना तीन महिन्यांचे एकत्रित पैसे मिळण्याची शक्यता आहे. यासाठी पात्र महिलांना केवळ दोन प्रश्नांची अचूक उत्तरे द्यावी लागणार आहे.
महिला बालविकास विभागाने लाभार्थी महिलांसाठी पुन्हा एकदा ऑनलाइन प्रक्रिया सुरू करण्यात आलीये. लाडकी बहीण योजनेअंतर्गत दुर्बल महिलांना महिन्याला १५०० रुपये आर्थिक मदत दिली जाते. महिन्याचा हा आर्थिक लाभ मिळवण्यासाठी ई-केवायसी बंधनकारक करण्यात आलीये.

अनेक महिलांनी मोबाईल नसणे, इंटरनेटचा अभाव, आधारकार्ड (resumes) बँक खात्याशी लिंक नसणे, ओटीपी न येणे यांसारख्या बाबींमुळे अनेक महिलांना प्रक्रिया योजनेचे पैसे मिळाले नव्हते. यंदा ई-केवायसी करताना दोन प्रश्नांची उत्तरे देताना योग्य उत्तरे द्यावीत.लाडक्या बहिणींनी केवायसी प्रक्रिया पूर्ण करण्यासाठी आधार क्रमांक टाकून ओटीपी टाकून लॉगिन करावे. तुम्हाला ओटीपी येत असल्यास तुम्ही योजनेत ई-केवायसीची दुरुस्ती करण्यास पात्र आहात. ईकेवायी पूर्ण करणाऱ्या लाभार्थी महिलांना डिसेंबर, जानेवारी आणि फेब्रुवारी महिन्याचे एकत्रित ४५०० रुपये मिळण्याची शक्यता आहे.
कोणते प्रश्न विचारण्यात येतात?
A) माझ्या कुटुंबातील सदस्य नियमित/कायम कर्मचारी म्हणून सरकारी विभाग/उपक्रम/मंडळ/भारत सरकार किंवा राज्य सरकारच्या स्थानिक संस्थेमध्ये कार्यरत आहे का ?
B) माझ्या कुटुंबातील सदस्य नियमित/कायम कर्मचारी म्हणून सरकारी विभाग/उपक्रम/मंडळ/भारत सरकार किंवा राज्य सरकारच्या स्थानिक संस्थेमधून सेवानीवृत्तीनंतर निवृत्तीवेतन घेत आहे का?
योजनेअंतर्गत विचारण्यात आलेल्या प्रश्नांना योग्य उत्तरे द्यावी लागणार आहे. (resumes) दोन्ही प्रश्नांना दिलेली उत्तरे खरी असावीत. खोटी माहिती आढळल्यास कारवाईस पात्र राहील, अशी सूचना देखील देण्यात आल्या आहेत.लाडकी बहीण योजनेच्या अधिकृत वेबसाईटवर लॉगिन करावे. त्यानंतर दोन प्रश्न विचारण्यात आल्याचे दिसेल. तिथे जाऊन योग्य उत्तरे निवडावीत. उदा. तुमच्या सरकारी कर्मचारी किंवा निवृत्त वेतन घेणारा सदस्य नसेल, तर तुम्ही ‘नाही’ हा पर्याय निवडू शकता. तुम्ही कोणत्याही प्रकारची चुकीची उत्तरे दिल्यावर तुम्हाला अनेक अडचणी येण्याची शक्यता आहे.
हेही वाचा :
खुशखबर! आयकर विभागात नोकरीची संधी; पगार ८१,८०० रुपये; अर्ज कसा करावा?
सेमीफायनलमध्ये अफगाण शतकी जोडीचा धडाका! भारतासमोर 311 धावांचे तगडे लक्ष्य, फायनलची लढत रंगणार