गेल्या काही दिवसांपासून सोनं-चांदीच्या दरांमध्ये सातत्याने चढ-उतार सुरू (fluctuation) असल्यामुळे ग्राहकांमध्ये संभ्रमाचं वातावरण निर्माण झालं आहे. दागिने खरेदी करावेत की थांबावं, असा प्रश्न अनेकांच्या मनात आहे. मात्र मंगळवार, 24 मार्चची सकाळ खरेदीदारांसाठी दिलासादायक ठरली आहे. कारण आज बाजारात सोनं आणि चांदीच्या दरात लक्षणीय घसरण नोंदवण्यात आली आहे.

आज सकाळी चांदीच्या (fluctuation) दरात मोठी घसरण झाली असून तब्बल 7,015 रुपयांनी दर कमी झाला आहे. त्यामुळे चांदीचा भाव प्रति किलो 2 लाख 18 हजार 152 रुपयांवर आला आहे. सोन्याच्या दरातही घसरण पाहायला मिळाली आहे. पिवळ्या धातूचा दर जवळपास 3 हजार रुपयांनी कमी झाला असून सध्या 10 ग्रॅम म्हणजेच एक तोळा सोनं 1 लाख 37 हजार 459 रुपयांवर व्यवहार करत आहे.

सोनं-चांदीच्या दरातील ही घसरण सर्वसामान्य ग्राहकांसाठी नक्कीच (fluctuation) दिलासा देणारी असली, तरी गुंतवणूकदारांच्या चिंतेत भर पडली आहे. गेल्या वर्षभरात या मौल्यवान धातूंनी विक्रमी वाढ नोंदवली होती आणि यंदाही दर उच्चांक गाठतील, अशी अपेक्षा व्यक्त केली जात होती. मात्र जानेवारीच्या अखेरीपासून बाजारात घसरणीची सुरुवात झाली आणि त्यानंतर सातत्याने अस्थिरता कायम आहे.

जागतिक बाजारातील घडामोडींसोबतच (fluctuation) देशांतर्गत कमोडिटी बाजारातही या दरांवर परिणाम होत आहे. सोमवारी मल्टी कमोडिटी एक्सचेंज (MCX) वर सोन्याचे दर 3.61 टक्क्यांनी घसरून 1 लाख 39 हजार 280 रुपये प्रति 10 ग्रॅमवर बंद झाले होते, तर चांदीचे दर 0.59 टक्क्यांनी कमी होऊन 2 लाख 25 हजार 423 रुपये प्रति किलोवर स्थिरावले होते. या सततच्या चढ-उतारामुळे बाजारात अनिश्चिततेचं वातावरण निर्माण झालं असून पुढील काही दिवस दरांची दिशा काय राहणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

हेही वाचा :

राज्य सरकारचा शेतकऱ्यांसाठी मोठा निर्णय! गव्हावरील किमान आधारभूत किंमत वाढवली

मोठं संकट ओढावणार ! पेट्रोल-डिझेलचे दर ५० ते ६० रूपयांनी महागणार ?

हार्दिक कॅप्टन्सी सोडणार अन् सूर्याकडे MI ची धुरा ?

By admin

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *