महाराष्ट्र सरकारच्या लाडकी(KYC) बहीण योजनेत लाभार्थ्यांना दर महिन्याला १५०० रुपये दिले जातात. दरम्यान, अनेक महिलांचा लाभ बंद करण्यात आला आहे. लाडकी बहीण योजनेत निकषात न बसणाऱ्या महिलांचे लाभ बंद करण्यात आले आहे. याचसोबत ज्या महिलांनी केवायसी केली नाही त्यांचाही लाभ बंद करण्यात आला आहे. परंतु अनेक महिलांनी केवायसी करुनही त्यांचा लाभ बंद केला आहे.

त्यामुळे त्यांचे १५०० रुपये का(KYC) बंद झाले असा प्रश्न महिलांच्या मनात निर्माण झाला आहे.लाडकी बहीण योजनेत अनेक महिला निकषात बसत आहे, त्यांनी केवायसीदेखील पूर्ण केले तरीही त्यांचा लाभ बंद करण्यात आला आहे. यामागचे अनेक कारणे असू शकतात. चुकीचे बँक डिटेल्स, आधार-बँक अकाउंट लिंक नसणे, अर्ज करताना चुकीची माहिती तसेच कागदपत्रांमध्ये तफावत असल्याने अनेक महिलांचे लाभ बंद झाले आहे. एका कागदपत्रावर एक माहिती तर दुसरीकडे वेगळीच माहिती यामुळे त्यांचा लाभ बंद झाला आहे.
लाडकी बहीण योजनेत केवायसी (KYC) करताना अनेक महिलांकडून चुका झाल्या आहेत. यामध्ये प्रश्न नीट न कळल्याने महिलांनी चुकीची उत्तरे दिली आहे. त्यामुळे त्यांचा लाभ बंद केला आहे. तसेच कागदपत्रांमध्ये माहिती बरोबर नसल्याने लाभ बंद झाला आहे. परंतु आता महिलांना केवायसीत चुका झालेल्या महिलांना अजून एक संधी मिळणार आहे. या महिलांना ३१ मार्चपर्यंत केवायसी करायची आहे. महिलांनी लाडकी बहीण योजनेच्या पोर्टलवर जाऊन केवायसी करायची आहे. आता केवायसी करताना योग्य माहिती द्यायची आहे.