बदलत्या जीवनशैलीमुळे खाण्यापिण्याच्या सवयी झपाट्याने बदलत आहेत आणि त्याचा थेट परिणाम (health) आरोग्यावर होताना दिसतो. चुकीचा आहार, वेळेवर न खाणे आणि पोषक घटकांची कमतरता यामुळे शरीरात अनेक जीवनसत्त्वांचा अभाव निर्माण होतो. यामध्येच व्हिटॅमिन बी 12 ची कमतरता ही एक गंभीर पण दुर्लक्षित समस्या ठरत आहे. थकवा, अशक्तपणा जाणवत असतानाही बहुतांश लोक यामागे बी12 ची कमतरता असू शकते, याकडे दुर्लक्ष करतात.
व्हिटॅमिन बी12 हे मज्जासंस्थेच्या योग्य कार्यासाठी, लाल रक्तपेशींच्या निर्मितीसाठी तसेच त्वचा आणि केसांच्या आरोग्यासाठी अत्यंत आवश्यक आहे. मात्र भारतात मोठ्या प्रमाणावर लोक या कमतरतेने ग्रस्त आहेत. विशेषतः शाकाहारी लोकांमध्ये ही समस्या अधिक प्रमाणात आढळते. कारण बी12 हे प्रामुख्याने लाल मांस आणि मांसाहारी पदार्थांमध्ये अधिक प्रमाणात आढळते. याशिवाय दीर्घकाळ अॅसिडिटी किंवा गॅसवरील औषधे घेणाऱ्या व्यक्तींनाही बी12 ची कमतरता जाणवू लागते.

शरीरात बी12 ची पातळी कमी झाल्यास (health) वारंवार थकवा येणे, अशक्तपणा, हातपाय सुन्न होणे किंवा मुंग्या येणे, स्मरणशक्ती कमी होणे, केस गळणे आणि स्नायूंचा कमकुवतपणा यासारखी लक्षणे दिसून येतात. त्यामुळे वेळेवर याची दखल घेणे गरजेचे आहे. आहारतज्ज्ञांच्या मते, शाकाहारी लोकांसाठीही काही दुग्धजन्य आणि फोर्टिफाइड पदार्थ बी12 ची गरज भागवू शकतात.
दूध हे बी12 चे एक चांगले शाकाहारी स्रोत मानले जाते. गाईच्या दुधात (health) साधारणतः 1.1 मायक्रोग्राम व्हिटॅमिन बी12 असते, जे दैनंदिन गरजेपैकी सुमारे 45 टक्के भाग पूर्ण करू शकते. भारतीय घरांमध्ये दूध, चहा किंवा कॉफीच्या स्वरूपात रोजच्या आहाराचा भाग असते. संशोधनानुसार दुधातील बी12 शरीरात सहज शोषले जाते. आरोग्यासाठी दूध नियमित पिणे फायदेशीर असून हळदीचे दूध दाहक-विरोधी आणि जंतुनाशक गुणधर्मांमुळे अधिक लाभदायक ठरते.
दही हेही बी12 चा एक महत्त्वाचा स्रोत आहे. (health) कमी फॅटयुक्त दह्यामध्ये 0.6 ते 1.0 मायक्रोग्राम बी12 आढळते. आंबवलेले असल्यामुळे दही आतड्यांचे आरोग्य सुधारते आणि प्रोबायोटिक म्हणून कार्य करते. बी12 च्या कमतरतेमुळे होणारी जळजळ कमी करण्यास दही मदत करते. भारतीय आहारात दह्याचा समावेश सहज करता येतो, ज्यामुळे इतर पोषक घटकांचाही लाभ मिळतो.
घरगुती पनीरमध्येही बी12 चांगल्या प्रमाणात असते. 100 ग्रॅम पनीरमध्ये सुमारे 0.7 ते 0.8 मायक्रोग्राम बी12 आढळते, जे दैनंदिन गरजेपैकी सुमारे एक तृतीयांश आहे. पनीर हे प्रथिनांचे उत्तम स्रोत असून स्नायूंच्या मजबुतीसाठी उपयुक्त ठरते. स्नायू कमकुवतपणा किंवा बी12 च्या कमतरतेने त्रस्त असलेल्या व्यक्तींनी आहारात पनीरचा समावेश करणे फायदेशीर ठरू शकते.
याशिवाय फोर्टिफाइड सेरेल्स हेही बी12 ची पातळी राखण्यासाठी (health) उपयुक्त मानले जातात. नाश्त्यात सेवन केलेल्या फोर्टिफाइड सेरेल्समध्ये साधारणतः 1.0 ते 2.5 मायक्रोग्राम बी12 आढळते. अशा प्रकारच्या अन्नपदार्थांमुळे शरीरातील पोषक घटकांची गरज पूर्ण होते आणि अशक्तपणाचे प्रमाण 15 ते 20 टक्क्यांनी कमी होऊ शकते, असे तज्ज्ञांचे मत आहे.
एकूणच, व्हिटॅमिन बी12 ची कमतरता ही गंभीर आरोग्य समस्या ठरू शकते. त्यामुळे शाकाहारी लोकांनीही योग्य आहार निवडून, गरज असल्यास फोर्टिफाइड पदार्थांचा समावेश करून बी12 ची पातळी संतुलित ठेवणे आवश्यक आहे.
हेही वाचा :
खुशखबर! आयकर विभागात नोकरीची संधी; पगार ८१,८०० रुपये; अर्ज कसा करावा?
सेमीफायनलमध्ये अफगाण शतकी जोडीचा धडाका! भारतासमोर 311 धावांचे तगडे लक्ष्य, फायनलची लढत रंगणार