महाराष्ट्रात थंडीने पूर्णपणे निरोप घेतल्याचे चित्र दिसत असून फेब्रुवारी (state) महिन्यातच उन्हाळ्याची तीव्र झळ जाणवू लागली आहे. कोकण किनारपट्टीपासून विदर्भापर्यंत तापमान झपाट्याने वाढले असून अनेक भागांत पारा 35 अंशांच्या पुढे पोहोचला आहे. वाढत्या उष्णतेमुळे भारतीय हवामान विभागाने नागरिकांसाठी तापमानवाढीचा यलो अलर्ट जारी केला आहे.मुंबई , ठाणे , रायगड आणि पालघर परिसरात तापमान 35 अंश सेल्सिअसच्या पुढे गेल्यामुळे नागरिकांना दमट हवामानाचा मोठा त्रास सहन करावा लागत आहे. हवेतील आर्द्रता वाढल्याने उकाडा अधिक जाणवत असून घामाचा त्रास वाढला आहे. फेब्रुवारी महिन्यातच एप्रिलसारखी स्थिती निर्माण झाल्यामुळे येत्या महिन्यांत उष्णतेची तीव्रता किती वाढेल, याबाबत नागरिकांमध्ये चिंता व्यक्त केली जात आहे.

हवामान खात्याच्या माहितीनुसार, हिमालयीन भागातून येणाऱ्या (state) थंड वाऱ्यांचा प्रभाव कमी झाल्यामुळे राज्यातील गारवा संपला आहे. यापूर्वी दक्षिण किनारपट्टीवरील कमी दाबाच्या पट्ट्यामुळे काही भागांत अवकाळी पावसाची हजेरी लागली होती, मात्र आता पावसाचे सावट दूर झाल्याने तापमान झपाट्याने वाढू लागले आहे. त्यामुळे संपूर्ण कोकण पट्ट्यासह मुंबई महानगरात उन्हाचा चटका अधिक तीव्र होत असल्याचे स्पष्ट झाले आहे.पश्चिम महाराष्ट्रात पुणे सातारा आणि कोल्हापूर भागांत सकाळचा गारठा पूर्णपणे नाहीसा झाला असून दुपारच्या वेळी कडक ऊन जाणवत आहे. मराठवाड्यातही तापमानात सातत्याने वाढ होत असून छत्रपती संभाजीनगर परिसरात उष्णतेचा प्रभाव वाढताना दिसतो आहे.
विदर्भात नागपूर , अकोला आणि अमरावती येथेही कमाल तापमानात (state) लक्षणीय वाढ नोंदवली जात आहे.भारतीय हवामान विभागाच्या अंदाजानुसार, पुढील 24 तासांत मराठवाडा आणि विदर्भात उष्णतेची तीव्रता आणखी वाढू शकते. वाऱ्यांची दिशा बदलणे आणि किनारपट्टीवरील चक्राकार स्थितीमुळे राज्यात आकाश बहुतेक ठिकाणी निरभ्र राहण्याची शक्यता असून उन्हाचा चटका कायम राहणार आहे. उत्तरेकडील पर्वतीय भागांत हलक्या पावसाची शक्यता वर्तवण्यात आली असली तरी महाराष्ट्रात मात्र उष्णतेचा प्रभाव टिकून राहणार असल्याचे हवामान खात्याने स्पष्ट केले आहे.
हेही वाचा :
पंचायत समितीच्या निवडणुकीत ड्रग्जचा वापर? कार्यकर्त्यांना ड्रग्ज दिलं; राष्ट्रवादीच्या नेत्याचा गंभीर आरोप
महाराष्ट्र पुन्हा हादरला! सहावीतील विद्यार्थ्यावर वर्गमित्रांकडून लैंगिक अत्याचाराचा प्रयत्न
विद्यार्थ्यांनो वर्षातील १६ सुट्ट्या रद्द; शिक्षण विभागाचा मोठा निर्णय!