उपवासाच्या दिवशी सकाळच्या नाश्त्यात तुम्ही साबुदाणा(delicious) टिक्की बनवू शकता. हा पदार्थ चवीला अतिशय सुंदर लागतो. कमीत कमी वेळात आणि साहित्यामध्ये साबुदाणा टिक्की तयार होते.

श्रावण महिन्याच्या प्रत्येक सोमवारी महिलांसह पुरुष सुद्धा उपवास करतात. श्रावणात केलेला उपवास आरोग्यासाठी अतिशय चांगला असतो. या महिन्यात पूजा, व्रत किंवा इतर (delicious)अनेक धार्मिक कर्यक्रमांचे आयोजन केले जाते. सतत प्रत्येक सोमवारी उपवास केला जातो. उपवासाच्या दिवशी नाश्त्यात नेहमीच काय बनवावं? हे बऱ्याचदा अनेकांना सुचत नाही. साबुदाणा खिचडी, साबुदाणा वडा किंवा इतर पदार्थ खाण्याचा सगळ्यांचं कंटाळा येतो. अशावेळी तुम्ही सोप्या पद्धतीमध्ये साबुदाणा टिक्की बनवू शकता. हा पदार्थ घरातील सगळ्यांचं खूप जास्त आवडेल. साबुदाणा टिक्की तुम्ही दही, शेंगदाण्याची चटणी किंवा काकडीच्या रायत्यासोबत सुद्धा खाऊ शकता. साबुदाणा टिक्की तुम्ही उपवासाच्या दिवशी नाहीच तर इतर वेळी सुद्धा सकाळच्या किंवा संध्याकाळच्या नाश्त्यासाठी बनवू शकता. चला तर जाणून घेऊया साबुदाणा टिक्की बनवण्याची सोपी रेसिपी.

साहित्य:
साबुदाणा
बटाटा
मीठ
शेंगदाणे
कोथिंबीर
जिऱ्याची पावडर
हिरवी मिरची
तेल
रविवार होईल आणखीनच मस्त! लहान मुलांसाठी झटपट बनवा हेल्दी टेस्टी चपाती पिझ्झा, नोट करून घ्या रेसिपी

कृती:
साबुदाणा टिक्की बनवण्यासाठी सर्वप्रथम, साबुदाणे स्वच्छ धुवून रात्रभर पाण्यात भिजत ठेवा. त्यानंतर सकाळी पाणी काढून टाका.
मोठ्या भांड्यात भिजवलेले साबुदाणे, शेंगदाण्याचा कूट, मॅश केलेला बटाटा, हिरव्या मिरचीची पेस्ट आणि चवीनुसार मीठ घालून व्यवस्थित मिक्स करून घ्या.
तयार केलेल्या मिश्रणात कोथिंबीर आणि जिऱ्याची पावडर टाकून पुन्हा एकदा मिश्रण हाताने मिक्स करा.
साबुदाण्याच्या मिश्रणाच्या टिक्की बनवून कढईमधील गरम तेलात तळून घ्या.
तयार आहेत सोप्या पद्धतीमध्ये बनवलेल्या साबुदाणा टिक्की.

हेही वाचा :

शेवटच्या श्रावणी सोमवारी उपवासाला बनवा पौष्टिक स्मूदी, दिवसभर राहाल उत्साही

दिवस उजाडला… पण नावापुरता! पावसाच्या ढगांमुळं मुंबईपासून कोकणापर्यंत काळोख, सतर्कतेचा इशारा जारी

आकाशातून निसर्ग पाहण्याचा अनोखा अनुभव घ्यायचा असेल तर ‘या’ आहेत भारतातील सर्वोत्तम Ropeway Rides

By admin

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *