पॅनकेक खायला सगळ्यांचं खूप जास्त आवडतात.(pancakes) म्हणूनच आज आम्ही तुम्हाला सोप्या पद्धतीमध्ये चॉकलेट पॅनकेक बनवण्याची रेसिपी सांगणार आहोत. चॉकलेट पॅनकेक तुम्ही वेगवेगळ्या फळांसोबत सुद्धा खाऊ शकता.

सकाळी उठल्यानंतर लहान मुलांसह मोठ्यांना नाश्त्यात काय खावे? सुचत नाही. सकाळी पोटभर नाश्ता केल्यास आरोग्याला अनेक फायदे होतात. यामुळे पोट दीर्घकाळ भरलेले राहते आणि लवकर भूक लागत नाही. लहान मुलांना पॅनकेक खायला खूप जास्त आवडतात. म्हणूनच आज आम्ही तुम्हाला सोप्या पद्धतीमध्ये चॉकलेट पॅनकेक बनवण्याची सोपी रेसिपी सांगणार आहोत. लहान मुलांना चॉकलेट खायला खूप जास्त आवडते. नाश्त्यात नेहमीच कांदापोहे, उपमा, शिरा किंवा डोसा खाऊन कंटाळा आल्यानंतर काहींना काही नवीन पदार्थ खाण्याची(pancakes) सगळ्यांचं खूप जास्त इच्छा होते. नाश्त्यामध्ये विकत मिळणाऱ्या तेलकट किंवा तिखट पदार्थांचे सेवन करण्याऐवजी घरी बनवलेले पदार्थ खावेत. चला तर जाणून घेऊया चॉकलेट पॅनकेक बनवण्याची सोपी रेसिपी.
साहित्य:
कोको पावडर
मैदा
चॉकलेट
बेकिंग सोडा
बेकिंग पावडर
पिठीसाखर
दूध
व्हॅनिला एसेन्स
बटर
चॉकलेट सॉस
कृती:
चॉकलेट पॅनकेक बनवण्यासाठी सर्वप्रथम, मोठ्या वाटीमध्ये मैदा, कोको पावडर, साखर, बेकिंग पावडर, बेकिंग सोडा आणि मीठ घालून व्यवस्थित मिक्स करून घ्या.
त्यानंतर त्यात आवश्यकतेनुसार दूध, वितळलेले लोणी आणि व्हॅनिला एसेन्स घालून मिक्स करून घ्या.
पॅनकेक बनवण्यासाठी पॅन गरम करण्यासाठी ठेवा. तयार केलेल्या पिठाचे गोलाकार पॅनकेक बनवून बाजूने थोडेसे बटर टाकून दोन्ही बाजूने व्यवस्थित भाजून घ्या.
तयार केलेले पॅनकेक ताटात काढून वरून त्यावर बारीक तुकडे केलेली फळे, मॅपल सिरप, चॉकलेट सॉस आणि आईस्क्रीम घालून सर्व्ह करा.
तयार आहे सोप्या पद्धतीमध्ये बनवलेले चॉकलेट पॅनकेक. हा पदार्थ लहान मुलांच्या डब्यासाठी सुद्धा उत्तम पर्याय आहे.
हेही वाचा :
टी 20I नंतर आता वनडेचा थरार, दक्षिण आफ्रिका ऑस्ट्रेलियाचा हिशोब करणार?
बिग बॉस 19 च्या स्पर्धकांची यादी समोर? अनेक नावे जाणून नक्कीच धक्का बसेल
एकादशीच्या दिवशी चुकूनही करु नका या चुका, अन्यथा मोडू शकतो तुमचा उपवास