भारतीय नाश्त्यातील (breakfast)सर्वात लोकप्रिय पदार्थ म्हटलं की ‘पोहे’ हे नाव नक्कीच येतं. महाराष्ट्रात तर पोहे म्हणजे घरी आलेल्या पाहुण्यांची खास ट्रीट! पण रोजचे तेच साधे पोहे खाऊन कंटाळा आला असेल तर? मग पोह्याचाच एक मजेदार, क्रिस्पी आणि तोंडाला पाणी सुटेल असा नवा अवतार पोहे रोल्स एकदम धमाल करून टाकतील! ही रेसिपी फक्त चविष्टच नाही तर अतिशय हेल्दीही आहे. तेल कमी, भाज्या भरपूर आणि बनवायला फार वेळही लागत नाही. खास करून मुलांना किंवा ऑफिसला जाणाऱ्यांना डब्यात काहीतरी वेगळं द्यायचं असेल तर हा पर्याय एकदम परफेक्ट. दिसायला आकर्षक, खायला मजेदार आणि बनवायला अगदी सोपेअसे हे पोहे रोल्स आजकाल कॅफे, टिफिन सेंटर आणि पार्टी स्नॅक्समध्येही खूप ट्रेंडमध्ये आहेत.

साध्या पोह्यांना एका डिशमध्ये बदलून रोलच्या स्वरूपात बनवणं ही एक क्रिएटिव्ह कल्पना आहे. कुरकुरीत बाहेरची लेयर आणि आतमध्ये मसालेदार भाज्यांचा स्वाद एकदम भारी! चहा किंवा नाश्त्यासोबत(breakfast) झटपट खाता येणारी, आणि पाहुणे आल्यावर फटाफट बनवता येणारी ही रेसिपी तुमच्या किचनची शान वाढवेल.
पोहे रोलसाठी लागणारे साहित्य
जाडे पोहे – 2 कप
बटाटा – 2 उकडून मॅश केलेले
हिरवी मिरची – 2 बारीक चिरलेली
कांदा – 1 बारीक चिरलेला
कोथिंबीर – 2 टेबलस्पून
आले-लसूण पेस्ट – 1 टीस्पून
हळद – ½ टीस्पून
गरम मसाला – ½ टीस्पून
लाल तिखट – 1 टीस्पून
लिंबाचा रस – 1 टीस्पून
मीठ – चवीनुसार
तांदूळ पीठ किंवा कॉर्नफ्लोअर – 2 टेबलस्पून (बाइंडिंगसाठी)
तेल – तळण्यासाठी किंवा शॅलो फ्रायसाठी
कृती
पोहे चाळणीत टाकून हलकं पाणी शिंपडा. खूप पाण्यात भिजवू नका, नाहीतर पोहे मऊ होऊन गिच्च होतील. 2-3 मिनिटे तसेच ठेवून द्या.मोठ्या भांड्यात भिजलेले पोहे, मॅश केलेले बटाटे, कांदा, हिरवी मिरची, कोथिंबीर, आले-लसूण पेस्ट, तिखट, हळद, गरम मसाला, लिंबाचा रस आणि मीठ घाला.सगळे साहित्य नीट मिसळा.मिश्रण जास्त सैल वाटत असेल तर 2 टेबलस्पून तांदूळ पीठ किंवा कॉर्नफ्लोअर घाला.
हाताला थोडंसं तेल लावून रोल किंवा सिलिंडरच्या आकाराचे लांबट पोहे रोल तयार करा.तव्यावर थोडंसं तेल टाकून रोल्स शॅलो फ्राय करा. दोन्ही बाजूंनी छान गोल्डन ब्राऊन आणि कुरकुरीत होईपर्यंत परता. किंवा हवं असल्यास डीप फ्रायही करू शकता.गरमागरम रोल्स टोमॅटो सॉस किंवा मिंट चटणीसोबत सर्व्ह करा.मुलांच्या डब्यात देण्यासाठी रोल्स छोटे-छोटे काप करून बाईट-साइज बनवू शकता.पार्टी स्टार्टर म्हणूनही हा एकदम हिट पर्याय आहे.

हेही वाचा :
40 व्या वर्षी दुसऱ्यांदा आई होणार सोनम कपूर…
‘मी बराचवेळ त्याच्या कमरेला पकडून उभी होते’, गिरीजाने…
दाम्पत्यावर केलेला तो हल्ला विसर्जनातील वादातूनच; कागलमधून चौघांना अटक