भारतीय स्वयंपाकघरात मेथी ही अगदी साधी दिसणारी हिरवळीची भाजी असली तरी तिचं महत्व मात्र अफाट आहे. आजी-आईंच्या हातची मेथी पराठा, मेथीची भाजी(vegetables), मेथीचे वडे… अशा कितीतरी पाककृतींमध्ये मेथीचा सुगंध कायम घरभर दरवळत राहतो. मेथीची थोडीशी कडूपणा असली तरी त्याच कडूपणात तिची खरी चव दडलेली असते. विशेषतः हिवाळ्यात मिळणारी ताजी, रसाळ मेथी तर आपल्या तब्येतीसाठी वरदानच मानली जाते.

लसूण आणि मेथी ही जोडी तशी थोडी वेगळी वाटत असली तरी दोघांचं चवीचं नातं जबरदस्त जमून येतं. लसणीचा तीखट, सुगंधी स्वाद आणि मेथीची ताजीतवानी चव एकत्र आली की तयार होतो लसूणी मेथीचा अतिशय खास, पारंपरिक आणि पौष्टिक प्रकार. ही भाजी चपाती, भाकरी किंवा गरमागरम वरण-भातासोबतखूपच अप्रतिम लागते. चला तर मग या लसूणी मेथीच्या या रेसिपीसाठी लागणारे साहित्य आणि कृती जाणून घेऊया.

साहित्य

ताजी मेथी – २ मोठे जुडी
तेल – २–३ टेबलस्पून
जिरं – १ टीस्पून
हिंग – चिमूटभर
लसूण – १०–१२ पाकळ्या (बारीक ठेचलेल्या किंवा चिरलेल्या)
हिरवी मिरची – २ (बारीक चिरलेली)
हळद – ½ टीस्पून
लाल तिखट – १ टीस्पून
मीठ – चवीनुसार

कृती

सर्वप्रथम मेथीची पाने निवडून स्वच्छ धुवा, पाणी चांगले निथळू द्या.नंतर पानं जाडसर चिरून बाजूला ठेवा.आता कढईत तेल गरम करा.त्यात जिरे टाका, जिरे तडतडले की चिमूटभर हिंग टाका.आता त्यात ठेचलेली लसूण आणि हिरवी मिरची घाला.लसूण सोनेरी रंग येईपर्यंत परता,इथेच लसूणी मेथीचा अस्सल सुगंध तयार होतो लसूण थोडा तांबूस होऊ लागली की हळद आणि लाल तिखट घाला.मसाले ५–७ सेकंद परता आणि चिरलेली मेथी कढईत टाका.ती शिजताना थोडी पाण्याची उदी करते, म्हणून जास्त पाणी घालू नका.शेवटी मिठ घाला आणि मध्यम आचेवर ६–७ मिनिटे ढवळत शिजवून घ्या.

भाजी(vegetables) पूर्णपणे मऊ होईपर्यंत आणखी २ मिनिटं शिजवा.लसूणी मेथी ही भाजी गरम ताज्या चपातीसोबत,ज्वारी/नाचणीच्या भाकरीसोबत, किंवा वरण-भातासोबत अतिशय स्वादिष्ट लागते.तुम्हाला हवं असल्यास वरून थोडं तूप टाकलं तरी चवीला अप्रतिम उठाव येतो.मेथी जास्त कडू वाटत असल्यास ती चिरून मीठ लावून १० मिनिटं ठेवून नंतर स्वच्छ धुवून वापरावी.लसूण जास्त आवडत असल्यास शेवटी वरून १ चमचा तुपात परतलेली लसूणीची फोडणीही घालू शकता.या भाजीत कांदा वापरला जात नाही, पण आवडत असल्यास एक कांदा परतून घालू शकता.

हेही वाचा :

माझा मुलगा तुझ्यासोबत संबंध ठेवत आहे की नाही? नसेल, तर मीच येतो; सासऱ्यांकडून

4 लग्न, 12 पुरुष, शारीरिक संबंध, 8 कोटींचा व्यवहार, डॉक्टर-पोलीस कोणीच तिच्या मोहातून सुटलं नाही

एकनाथ शिंदेंना एकटं सोडून शिवसेनेचे सर्व मंत्री…

By admin

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *