सकाळच्या वेळी पोटभर नाश्ता करणे ही अतिशय आरोग्यदायी(healthy) सवय आहे. नाश्ता केल्यामुळे पोट दीर्घकाळ भरलेले राहते आणि शरीराला अनेक फायदे होतात. नेहमीच सकाळच्या नाश्त्यात कांदापोहे, उपमा, शिरा खाऊन कंटाळा आल्यानंतर काहींना काही नवीन पदार्थ खाण्याची सगळ्यांचं इच्छा होते. अशावेळी तुम्ही सोप्या पद्धतीमध्ये पालक मूगडाळीचे आप्पे बनवू शकता. आप्पे हा साऊथ इंडियन पदार्थ सगळ्यांचं खायला खूप जास्त आवडतो. खोबऱ्याची चटणी किंवा हिरव्या चटणीसोबत आप्पे अतिशय सुंदर लागतात.

लहान मुलं वेगवेगळ्या पालेभाज्या खाण्यास कायमच नकार देतात. अशावेळी तुम्ही मुलांना पालेभाज्यांपासून वेगवेगळे पदार्थ खाण्यास देऊ शकता. पालक खाल्यामुळे शरीराला भरपूर पोषण(healthy) मिळते. पालकमध्ये असलेल्या गुणधर्मांमुळे शरीरात निर्माण झालेली लोहाची कमतरता भरून निघते आणि थकवा, अशक्तपणा अजिबात जाणवत नाही. मुगाची डाग सहज पचन होते. पचनक्रिया बिघडल्यानंतर मुगाच्या डाळीची सेवन करावे. चला तर जाणून घेऊया पालक मुगडाळ आप्पे बनवण्याची सोपी रेसिपी.
साहित्य:
पालक
मुगडाळ
हिरवी मिरची
आलं
मीठ
कोथिंबीर
बेसन
पनीर
लाल तिखट
गरम मसाला
चाट मसाला
तेल
कृती:
पालक मुगडाळ आप्पे बनवण्यासाठी सर्वप्रथम, पालक स्वच्छ करून पाण्याने धुवून घ्या. त्यानंतर बारीक चिरा.मिक्सरच्या भांड्यात भिजवलेली मुगडाळ, पालक, आलं लसूण, हिरवी मिरची आणि कोथिंबीर घालून बारीक पेस्ट तयार करा.तयार केलेली पेस्ट वाटीमध्ये काढून त्यात किसून घेतलेले पनीर, बेसन, लाल तिखट, हळद आणि चवीनुसार मीठ घालून मिक्स करा. नंतर त्यात आवडीनुसार चाट मसाला घालावा.तयार केलेल्या पेस्टमध्ये आवश्यकता वाटल्यास पाणी घालावे. आप्पे बनवण्यासाठी आप्पे पात्र गरम करण्यासाठी ठेवा.त्यात तेल घालून आप्पे पीठ घाला आणि दोन्ही बाजूने कुरकुरीत भाजा.तयार आहेत सोप्या पद्धतीमध्ये बनवलेले पालक मुगडाळ आप्पे.

हेही वाचा :
नितीश कुमारांचा मुख्यमंत्रीपदाचा राजीनामा…
इंदुरीकर महाराज पुन्हा तापले, मुलीचं लग्न तर थाटात करणारच, पण आता.., दिलं नवं चॅलेंज
“काँग्रेस लवकरच फुटेल…”, बिहार निकालानंतर पंतप्रधानांच्या भविष्यवाणीवर शरद पवारांचे मोठे विधान