अनेकदा आपल्या खिशात नोटा तशाच पडून राहतात. (notes) अथवा व्यवहारात वापरताना त्या फाटतात. जीर्ण होतात. अशा नोटा मग चुकून आपल्या माथी येतात. त्या कुठून आल्या हे पण कळत नाहीत, कारण एखाद्या बंडलमध्ये अथवा नोटांमध्ये त्या एकदम दडवल्या जातात. नोट हलकी जरी फाटकी असली, तिचा कोपरा फाटलेला असला. त्यावरील नोटेचा क्रमांक वा डिझाईन स्पष्ट दिसत नसेल तर अशा नोटा कोणीच घेत नाहीत. त्यातच नोटेचे दोन भाग झालेले असतील अथवा चिकट टेपने त्या चिकटवलेल्या असतील तर मग बाजारात या नोटांना कोणी हातही लावत नाहीत. या नोटा आपल्याकडून कोणी घेत ही नाही. अशावेळी या नोटा थेट बँकेत जमा करणे फायद्याचे ठरते.

जर तुमच्याकडे एखादी नोट फाटकी अथवा खराब असेल तर चिंता करू (notes)नका अथवा ती दुसर्‍या कुणाच्या माथी मारण्याची कसरत करू नका. या नोटा सहज बँकेत बदलता येतात. भारतीय रिझर्व्ह बँकेच्या नियमानुसार, सर्व बँका फटक्या वा खराब नोटा स्वीकारतात. तपासणीनंतर तुम्हाला बँका तात्काळ नवीन नोट देतात. जेव्हा तुम्ही बँकेत पोहतात. तेव्हा बँक कर्मचारी नोटेची पडताळणी करतो. तिला दोन प्रकारच्या श्रेणीत ठेवतो. जर नोट केवळ मळकट वा जुनी असेल तर तिला सोईल्ड नोट म्हटले जाते. तर नोट फाटकी अथवा कोपरे तुटलेले असतील म्युटिलेटेड नोट या प्रकारात ही नोट ठेवली जाते. दोन्ही प्रकारात बँक तुम्हाला त्याच मुल्याची नवीन नोट देते.

या प्रक्रियेत काही गोष्टी लक्षात घ्या. नोटेवर दोन्ही बाजूचा क्रमांक स्पष्टपणे दिसणे आवश्यक आहे. (notes) जर नोटेवरील क्रमांक पुसल्या गेला अथवा गायब झाला तर नोट बदलता येणार नाही. खोटी नोट नको, नकली नोट नको, बँक ती बदलून देणारच नाही उलट तुमच्यावर पोलीस कारवाई होईल. गुन्हा दाखल होईल. त्यामुळे नाहक असल्या भानगडीत अजिबात पडू नका. जर नोट दोन भागात फाटली असेल, तिचे दोन तुकडे झाले असतील तर दोन्ही तुकडे सोबत न्या. या नोटेला टेप लावू नका अथवा स्टॅपल करण्याचा प्रयत्न करू नका. त्यामुळे नोटेचे डिझाईन वरखाली होण्याची शक्यता आहे.

विशेष म्हणजे तुम्ही तर नोट बदलणार असाल तर त्यासाठी बँक कोणतेही अतिरिक्त शुल्क वसूल करत नाही. अथवा तुम्हाला कमी मूल्याची नोट देत नाही. ज्या मूल्याची नोट तुम्ही दिली असेल त्याच मूल्याची नोट तुम्हाला मिळेल. ही सुविधा पूर्णपणे मोफत आहे. त्यामुळे जर फाटकी नोट तुमच्याकडे आली असेल तर चिंता करू नका. अगोदर ती नोट बँकेत जमा करून नवीन नोट घ्या. या प्रक्रियेसाठी कोणतेही अर्ज फाटे करण्याची गरज नाही.

हेही वाचा :

आठव्या वेतन आयोगात पगारवाढ कधीपासून? एरियर किती मिळणार? वाचा नवीन अपडेट

गुगलची डिजिटल स्ट्राइक! प्ले स्टोअरवरून ब्लॉक केले ‘हे’ विषारी अ‍ॅप्स; जर तुमच्या मोबाईलमध्ये असतील तर, लगेच करा डिलीट

शेतकरी मित्रांनो सावधान! ‘या’ अटी पूर्ण नसतील तर २२ वा हप्ता अडकणार

By admin

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *