अभिनेता करण सिंह ग्रोवर आज त्याचा 44 वा वाढदिवस साजरा करत आहे. (owner) 1982 मध्ये दिल्ली येथे जन्मलेला करण पंजाबी सिख कुटुंबातून आहे. लहानपणी काही वर्षे भारतात राहिल्यानंतर त्याचे कुटुंब सऊदी अरेबियात गेले आणि तिथेच त्याचे शालेय शिक्षण झाले. पुढे अभिनय, मॉडेलिंग आणि फिटनेस या तिन्ही क्षेत्रात स्वतःची वेगळी ओळख तयार करणारा करण आज टीव्ही-चित्रपट जगतात परिचित चेहरा बनला आहे. साध्या सुरुवातीपासून स्टारडमपर्यंतचा त्याचा प्रवास अनेक चढ-उतारांनी भरलेला आहे. त्याच्या वाढदिवसानिमित्त त्याच्या करिअरसोबत वैयक्तिक आयुष्यातील काही चर्चित गोष्टीही पाहूया.दम्माम सऊदी अरेबिया येथे त्याने शालेय शिक्षण पूर्ण केले. नंतर मुंबईत येऊन IHM Mumbai मधून हॉटेल मॅनेजमेंटचा कोर्स केला. काही काळ ओमानमधील Sheraton Hotel मध्ये मार्केटिंग एक्झिक्युटिव्ह म्हणून कामही केले. पण अभिनयाची आवड जास्त असल्याने त्याने 2004 मध्ये Gladrags Manhunt Contest मध्ये भाग घेतला आणि Most Popular Model हा किताब जिंकला. त्यानंतर त्याला Balaji Telefilms च्या ‘कितनी मस्त है जिंदगी’ मालिकेत काम मिळाले.

2007 मध्ये ‘दिल मिल गए’ मालिकेत डॉ. अर्जुन मलिकची भूमिका करताच (owner) करण तरुणाईमध्ये प्रचंड लोकप्रिय झाला. विशेषतः मुलींमध्ये त्याची मोठी फॅन फॉलोइंग तयार झाली. पुढे त्याने ‘झलक दिखला जा 3’ आणि ‘फियर फॅक्टर – खतरों के खिलाड़ी’ या रिअॅलिटी शोमध्ये सहभाग घेतला. काही वर्षांनी तो ‘कसौटी जिंदगी की 2’ मध्येही दिसला आणि पुन्हा चर्चेत आला.करणच्या वैयक्तिक आयुष्याची चर्चा त्याच्या करिअरइतकीच झाली. 2008 मध्ये त्याने अभिनेत्री श्रद्धा निगमशी लग्न केले, पण त्याच काळात कोरिओग्राफर Nicole Alvares सोबत त्याचे अफेअर असल्याच्या बातम्या आल्या आणि 2009 मध्ये दोघांचा घटस्फोट झाला. नंतर ‘दिल मिल गए’मध्ये एकत्र काम करताना तो जेनिफर विंगेटला डेट करू लागला. दोघांनी लग्न केले, मात्र 2014 मध्ये त्यांचेही नाते तुटले.
यानंतर ‘Alone’ चित्रपटाच्या शूटिंगदरम्यान तो बिपाशा बसुला जवळ आला. (owner) काही काळ डेटिंग केल्यानंतर 2016 मध्ये दोघांनी लग्न केले. आजही तो सोशल मीडियावर बिपाशासोबतचे फोटो शेअर करत असतो.टीव्हीनंतर करणने ‘Alone’ या चित्रपटातून बॉलिवूडमध्ये पदार्पण केले. त्यानंतर वेब प्रोजेक्ट्स, जाहिराती आणि फिटनेस ब्रँड्समुळे त्याला सतत काम मिळत राहिले. उपलब्ध माहितीनुसार करण सिंह ग्रोवरची एकूण संपत्ती अंदाजे 13 ते 15 कोटी रुपये इतकी मानली जाते. मेहनत आणि आकर्षक व्यक्तिमत्त्वाच्या जोरावर त्याने टीव्हीपासून चित्रपटांपर्यंत स्वतःची वेगळी ओळख निर्माण केली आहे
हेही वाचा :
आठव्या वेतन आयोगात पगारवाढ कधीपासून? एरियर किती मिळणार? वाचा नवीन अपडेट
शेतकरी मित्रांनो सावधान! ‘या’ अटी पूर्ण नसतील तर २२ वा हप्ता अडकणार