१९ वर्षीय कॉलेजच्या विद्यार्थिनीवर सामूहिक बलात्कार करण्यात आल्याची (booked) धक्कादायक घटना समोर आली आहे. कर्नाटकच्या बंगळुरूमध्ये ही घटना घडली. पीडित तरुणीच्या बॉयफ्रेंडनेच आपल्या मित्राच्या मदतीने तिच्यासोबत हे भयंकर कृत्य केले. पीडित मुलीला गुंगीचे औषध पाजून तिच्यावर आरोपींनी आळीपाळीने बलात्कर केला. ही घटना व्हॅलेंटाईन डेच्या दिवशी घडली होती. आरोपींनी पीडितेला जीवे मारण्याची धमकी दिली होती. त्यामुळे घाबरलेल्या तरुणीने हा प्रकार कुणाला सांगितला नव्हता पण आता तिने पोलिस ठाण्यात धाव घेत तक्रार दाखल केली. त्यानंतर ही धक्कादायक घटना समोर आली.

पीडित मुलीच्या बॉयफ्रेंडने व्हॅलेंटाईन डेच्या दिवशी जक्कूर येथे (booked) एक प्रायव्हेट व्हिला बुक केला होता. या व्हिलामध्ये तरुणी आपल्या बॉयफ्रेंडसोबत गेली होती. त्याठिकाणी तरुणीच्या बॉयफ्रेंडचे मित्र देखील होते. आरोपींनी पीडितेला गुंगीचे औषध दिले. त्यानंतर तिच्यावर सामूहिक बलात्कार केला. पीडित मुलगी बन्नेरघट्टा येथील एका खासगी महाविद्याल्यात शिक्षण घेत आहे. पश्चिम बंगालचा रहिवासी असलेल्या डिक्सिन नावाच्या तरुणावर तिचे प्रेम होते. त्यानेच तिच्यासोबत हे भयंकर कृत्य केले.

पीडितेने दिलेल्या तक्रारीत असे म्हटले आहे की, या वर्षी जानेवारीमध्ये (booked) तिची आरोपीसोबत इन्स्टाग्रामवरून ओळख झाली. दोघेही चॅटिंग करायचे. त्यानंतर आरोपी डिक्सिनने प्रेम व्यक्त केले. पीडित मुलीने देखील त्याच्या प्रेमाचा स्वीकार केला. १४ फेब्रुवारीला व्हॅलेंटाईन डेच्या दिवशी त्यांचे भेटण्याचे ठरले. पीडित मुलगी आपल्या मैत्रिणीसोबत गेली होती. सुरूवातीला आरोपीसोबत ती जेवली. त्यानंतर त्याने तिला जक्कुरमधील एका खासगी व्हिलामध्ये भेटण्यासाठी नेले. त्याठिकाणी गेल्यानंतर आरोपीने तिला गुंगीचे औषध दिले. पीडिता बेशुद्ध झाल्यानंतर डिक्सिन आणि त्याचा मित्र निखिलने तिच्यावर बलात्कार केला.

प्रेमाचे आमिष दाखवून आरोपीने तिच्यावर बलात्कार केल्याचा आरोप केला. आरोपीचा मित्र निखिलने दुसऱ्या दिवशी सकाळी पीडितेला घरी जाऊन दिले. या घटनेबद्दल कुणाला काही सांगितले तर तुला मारून टाकू अशी धमकी आरोपींनी दिली होती. घाबरलेली मुलगी इतक्या दिवस शांत बसली होती. पण नंतर पीडितेने घटनेची माहिती कुटुंबीयांना दिली तेव्हा त्यांना मोठा धक्का बसला. त्यानंतर पोलिस ठाण्यात तक्रार दाखल करण्यात आली. पोलिसांनी घटनेचे गांभीर्य लक्षात घेऊन आरोपींविरोधात गुन्हा दाखल केला. आरोपी फरार असून पोलिस त्यांचा शोध घेत आहेत.

हेही वाचा :

आठव्या वेतन आयोगात पगारवाढ कधीपासून? एरियर किती मिळणार? वाचा नवीन अपडेट

गुगलची डिजिटल स्ट्राइक! प्ले स्टोअरवरून ब्लॉक केले ‘हे’ विषारी अ‍ॅप्स; जर तुमच्या मोबाईलमध्ये असतील तर, लगेच करा डिलीट

शेतकरी मित्रांनो सावधान! ‘या’ अटी पूर्ण नसतील तर २२ वा हप्ता अडकणार

By admin

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *