आजच्या धावपळीच्या जीवनशैलीत तरुणांमध्ये तंदुरुस्त आणि मांसल शरीराची क्रेझ झपाट्याने (muscular body) वाढताना दिसत आहे. जिममध्ये नियमित हजेरी, कडक आहारनियोजन आणि व्हे प्रोटीनसारख्या पूरक आहारांचा वापर ही आता सामान्य बाब झाली आहे. स्नायूंची वाढ, ऊतींची दुरुस्ती आणि नवीन पेशी निर्माण करण्यासाठी प्रथिनांचे महत्त्व सर्वांनाच ठाऊक आहे. मात्र अनेक जण दररोज प्रथिनांचे सेवन करूनही अपेक्षित परिणाम मिळत नसल्याची तक्रार करत आहेत. वजन वाढत नाही, स्नायूंमध्ये मजबुती जाणवत नाही आणि उलट गॅस, फुगवटा, अपचन यांसारख्या समस्या उद्भवतात.

तज्ज्ञांच्या मते, केवळ प्रथिने जास्त प्रमाणात घेणे पुरेसे नसून ती (muscular body) योग्यरित्या पचणे आणि शरीरात शोषली जाणे अधिक महत्त्वाचे आहे. आयुर्वेदानुसार मंद जठराग्नी म्हणजेच कमकुवत पचनशक्ती हे यामागील प्रमुख कारण मानले जाते. प्रथिने पचवण्यासाठी पोटाला अधिक ऊर्जा लागते. पचनशक्ती कमी असल्यास प्रथिने पूर्णपणे तुटत नाहीत आणि शरीराला त्याचा पुरेपूर लाभ मिळत नाही. त्यामुळे काही आयुर्वेदिक उपाय उपयुक्त ठरू शकतात. काळी मिरी आणि आले हे पचन सुधारण्यासाठी प्रभावी मानले जातात. प्रोटीन शेकमध्ये चिमूटभर काळी मिरी आणि आल्याची पावडर मिसळल्यास पचन सुधारण्यास मदत होऊ शकते, असे जाणकार सांगतात.
तसेच पपई आणि अननस या फळांमध्ये नैसर्गिक एन्झाइम्स (muscular body) आढळतात. पपईतील पपेन आणि अननसमधील ब्रोमेलेन हे प्रथिनांचे लहान घटकांमध्ये विघटन करण्यास मदत करतात, ज्यामुळे पचन सुलभ होते. आयुर्वेदातील त्रिकुट चूर्ण, ज्यामध्ये आले, काळी मिरी आणि पिंपळीचा समावेश असतो, हे चयापचय क्रिया सुधारण्यास सहाय्यक मानले जाते. मात्र पूरक आहार घेत असताना पुरेशी झोप घेणेही तितकेच आवश्यक आहे. स्नायूंची वाढ केवळ व्यायामादरम्यान होत नाही, तर विश्रांती आणि झोपेच्या काळात शरीर त्यांची पुनर्बांधणी करते. अपुरी झोप असल्यास प्रथिनांचा योग्य उपयोग होत नाही.
यासोबत संतुलित आहाराचे महत्त्व अधोरेखित केले जाते. शरीराला आवश्यक पोषण मिळण्यासाठी (muscular body) थाळीत कार्बोहायड्रेट्स, प्रथिने, चांगले फॅट्स, जीवनसत्त्वे, खनिजे आणि तंतुमय पदार्थ यांचा समतोल असणे गरजेचे आहे. ज्वारी, बाजरी, नाचणी, तांदूळ आणि गहू यांसारखी धान्ये ऊर्जा देतात, तर डाळी, कडधान्ये, दूध, दही, अंडी किंवा मासे प्रथिनांचा उत्तम स्रोत ठरतात. शेंगदाणे, बदाम, अक्रोड, तीळ आणि जवस यांसारख्या घटकांमधील चांगले फॅट्स शरीराच्या वाढीसाठी उपयुक्त असतात. हिरव्या पालेभाज्या आणि हंगामी फळांमधून जीवनसत्त्वे व खनिजे मिळतात, तर पुरेसे पाणी पिणे पोषकद्रव्यांचे वहन सुरळीत ठेवते.
फायबरयुक्त (muscular body) अन्न पचन सुधारते आणि बद्धकोष्ठता टाळण्यास मदत करते. संपूर्ण धान्ये, ओट्स, डाळी, फळे आणि भाज्या यांचा आहारात समावेश असावा. तज्ज्ञांचे म्हणणे आहे की साखरयुक्त, प्रक्रिया केलेले आणि अति तेलकट पदार्थ टाळणे आवश्यक आहे, कारण ते शरीराला आवश्यक पोषण देत नाहीत आणि दीर्घकालीन आजारांचा धोका वाढवू शकतात. दिवसातून वेळेवर तीन मुख्य जेवणे आणि दोन हलके, पौष्टिक स्नॅक्स घेणे, अन्न व्यवस्थित चावून खाणे आणि अति खाणे टाळणे या सवयीही तितक्याच महत्त्वाच्या आहेत.
एकूणच, केवळ पूरक आहारांवर अवलंबून न राहता योग्य पचनशक्ती, संतुलित आहार, नियमित व्यायाम आणि पुरेशी झोप या घटकांचा समन्वय साधल्यासच अपेक्षित शरीरयष्टी मिळू शकते, असे तज्ज्ञांनी स्पष्ट केले आहे.
हेही वाचा :
आठव्या वेतन आयोगात पगारवाढ कधीपासून? एरियर किती मिळणार? वाचा नवीन अपडेट
शेतकरी मित्रांनो सावधान! ‘या’ अटी पूर्ण नसतील तर २२ वा हप्ता अडकणार