पंढरपूरातून धक्कादायक बातमी समोर आली आहे.(relationship) पत्नीने प्रियकराच्या मदतीने सासूला विष पाजून मारण्याचा कट रचला. परंतु यात तिच्या पतीचा दुर्दैवी मृत्यू झाल्याची घटना पंढरपूर तालुक्यातील उंबरगाव येथे घडली आहे. या प्रकरणी मयताची पत्नी सारिका लोहार आणि तिचा प्रियकर शेखर चंदनशिवे यांना पोलिसांनी अटक केली आहे. या घटनेने सोलापूर जिल्ह्यात खळबळ उडाली आहे.मिळालेल्या माहितीनुसार, मृत समोनाथ लोहार यांची पत्नी सारिका आणि त्याच गावातील शेखर चंदनशिवे यांच्यामध्ये अनैतिक प्रेमसंबंध होते. त्यांच्या या प्रेम संबंधाला सासूचा विरोध होता. अनैतिक प्रेमसंबंधाला अडसर ठरणाऱ्या सासूला पाण्यात विष टाकून मारण्याचा कट रचल्याचे पोलिस तपासात निष्पन्न झाले आहे.

१० जानेवारी २०२६ रोजी सकाळी सातच्या वाजण्याच्या सुमारास (relationship) प्रियखर शेखर याने प्रियसी सारिकाला शेतात बोलावून घेवून तिच्याकडे पांढरे रंगाचे विषारी औषध असलेली एक अर्धवट भरलेली बिस्लरीची बाटली दिली. आपल्या दोघांच्या प्रेमसंबधाला आड येणाऱ्या तुझ्या सासूच्या पिण्याचे पाणी असलेल्या कळशीत हे औषध ओत म्हणजे ती मरुण जाईल, असे सांगितले.त्यानुसार सारिकाने रात्री आठच्या सुमारास घरात कोणीही नसताना सासुने पिण्यासाठी पाणी भरून ठेवलेल्या कळशीत बाटलीतील विषारी औषध टाकले. त्यानंतर सासूने कळशीतील पाणी तांब्यात घेवून पिले त्यावेळी तीला पाण्याची चव कडू लागली. म्हणून तो पाण्याचा तांब्या मुलगा समाधान जवळ ठेवून गेली. त्याच तांब्यातील पाणी समाधान याने जेवण केल्यानंतर पिले.
त्यानंतर समाधानला रात्री साडे अकराच्या वाजण्याच्या सुमारास उलट्याचा त्रास होवु (relationship) लागला म्हणून उपचारासाठी खाजगी रुग्णालयात दाखल करण्यात आले. उपचारा दरम्यान समाधानचा १६ जानेवारीला मृत्यू झाला. या घटनेनंतरही पोलिसांनी कोणतीच कारवाई केली नव्हती. लोहार समाजाने पोलिस ठाण्यावर मोर्चा काढल्यानंतर पोलिसांनी कारवाई केली. पोलिस कारवाईनंतर पत्नीने सासूवर विष प्रयोग करून जीवे मारण्याचा कट रचल्याचे पोलिस तपासात उघड झाले आहे. पोलिसांनी याप्रकरणी मृत समोनाथ लोहार यांची पत्नी आणि तिच्या प्रियकराला अटक करून पुढील तपास सुरु केला आहे.
हेही वाचा :
जगभरात खळबळ! अमेरिकेला सर्वात मोठा झटका
PhonePe युजर्ससाठी खुशखबर! आता पिन कोडची गरज नाही, पेमेंट करण्यासाठी नवी पद्धत, वाचा…