टी20 वर्ल्ड कप 2026 च्या सुपर-8 टप्प्यात भारतीय संघाची वाट अधिकच कठीण झाली आहे.(equation) दक्षिण आफ्रिकेविरुद्ध 76 धावांनी पराभव झाल्यानंतर टीम इंडियाचा नेट रन रेट 3.800 इतका घसरला आहे. त्यामुळे आता केवळ विजय पुरेसा ठरणार नाही, तर मोठ्या फरकाने जिंकणे अत्यावश्यक बनले आहे.ग्रुप 1 मध्ये भारताचे झिम्बाब्वे आणि वेस्ट इंडिज विरुद्ध दोन सामने बाकी आहेत. उपांत्य फेरी गाठायची असेल तर हे दोन्ही सामने जिंकणे भाग आहे. मात्र गुणतालिकेत बरोबरी झाल्यास नेट रन रेट निर्णायक ठरणार असल्याने झिम्बाब्वेविरुद्धच्या सामन्यात मोठ्या फरकाने विजय मिळवणे आवश्यक आहे.

जर भारताने प्रथम गोलंदाजी केली आणि समोरच्या संघाला कमी(equation) धावसंख्येत रोखले, तर लक्ष्य वेगाने गाठणे अत्यंत महत्त्वाचे ठरेल. उदाहरणार्थ, झिम्बाब्वेने 90 धावा केल्या तर भारताने ते लक्ष्य अवघ्या 9 षटकांत पूर्ण करणे गरजेचे आहे. 150 धावांचे लक्ष्य असेल तर 11 षटकांत सामना संपवावा लागेल. 180 ते 200 धावांचा स्कोर असेल, तर 12 ते 15 षटकांत विजय मिळवणे आवश्यक ठरेल. लक्ष्य जितके मोठे, तितकी वेगवान फलंदाजी आणि उच्च रनरेटची गरज वाढणार आहे.

जर टीम इंडियाने प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला, तर नेट रन रेट (equation) सकारात्मक करण्याचे आव्हान अधिक कठीण होईल. अशा वेळी भारताला किमान 220 ते 250 पेक्षा जास्त धावा उभाराव्या लागतील. त्यानंतर प्रतिस्पर्ध्याला 100-120 धावांच्या आत रोखणे गरजेचे ठरेल. विरोधी संघाला बाद करण्यात यश मिळाल्यास जास्त षटकांचा फायदा होऊन रनरेट सुधारू शकतो. पहिल्या सामन्यात भारतीय संघ ऑलआउट झाल्यामुळेच नेट रन रेट मोठ्या प्रमाणात घसरला आहे. त्यामुळे पुढील सामन्यात आक्रमक आणि नियोजनबद्ध कामगिरी करणे अत्यंत आवश्यक आहे. सेमीफायनलमध्ये पोहोचायचे असेल तर विजयासोबतच रनरेटमध्ये लक्षणीय सुधारणा करणे हेच खरे मोठे आव्हान ठरणार आहे.

हेही वाचा :

नोकरी बदलल्याने निष्क्रीय झालेल्या PF खात्यातील पैशांसंदर्भात सरकारचा मोठा निर्णय

हा देश म्हणजे हिऱ्याची खाण, भारताशी आहे खास नातं

जेवणाची योग्य वेळ काय? आरोग्याला कसा फायदा होणार जाणून घ्या

By admin

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *