लाडक्या बहिणींसाठी आनंदाची बातमी आहे. (deposited)लाडक्या बहिणींच्या खात्यात पैसे जमा होण्यास सुरुवात झाली आहे. राज्य सरकारने महिलांना मोठं गिफ्ट दिलं आहे. फेब्रुवारी महिना संपत आला तरीही खात्यात पैसे जमा न झाल्याने अनेक महिलांच्या मनात संभ्रम निर्माण झाला होता. त्यानंतर आता सरकारने थेट महिलांच्या खात्यात पैसे जमा केले आहेत.राज्याच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनाच्या पहिल्याच दिवशी लाभार्थी महिलांना अनपेक्षित गिफ्ट मिळालं आहे. त्यामुळे महिलांना दिलासा मिळाला आहे. जानेवारीचा हप्ता जमा होण्यास सुरुवात केली आहे. काल संध्याकाळी अनेक महिलांच्या खात्यात पैसे जमा झाले आहेत.

जानेवारी महिना संपला, आता फेब्रुवारी महिनादेखील संपत आला आहे. (deposited) तरीही दोन्ही महिन्याचा लाभ मिळाला नव्हता. यामुळे महिलांमध्ये नाराजी निर्माण झाली होती. दरम्यान, जानेवारी-फेब्रुवारीचे पैसे एकत्र येतील, असं सांगितलं जात होते. त्यानंतर आता एकाच महिन्याचा हप्ता देण्यात आला आहे. जानेवारीचे १५०० रुपये महिलांच्या खात्यात जमा होण्यास सुरुवात झाली आहे.
लाडकी बहीण योजनेत पात्र महिला ज्यांनी ईकेवायसी केली आहे त्यांनाच योजनेचा लाभ मिळणार आहे. (deposited) ईकेवायसी करण्याची मुदत आता संपली आहे. दरम्यान, ईकेवायसीमध्ये चुका असल्याने अनेक महिलांना मागच्या महिन्याचाही लाभ मिळाला नव्हता. त्या महिलांना या महिन्यातदेखील पैसे मिळणार नाहीत. त्यांना मार्च महिन्यानंतर रखडलेले हप्ते एकत्रितपणे दिले जातील.
हेही वाचा :
नोकरी बदलल्याने निष्क्रीय झालेल्या PF खात्यातील पैशांसंदर्भात सरकारचा मोठा निर्णय
हा देश म्हणजे हिऱ्याची खाण, भारताशी आहे खास नातं
जेवणाची योग्य वेळ काय? आरोग्याला कसा फायदा होणार जाणून घ्या