लाडकी बहीण योजनेच्या लाभार्थ्यांसाठी आनंदाची बातमी आहे.(beneficiaries) महिलांच्या खात्यात पैसे जमा होण्यास सुरुवात झाली आहे. जानेवारीचा हप्ता महिलांना मिळाला आहे. दरम्यान, सर्व लाभार्थी महिलांना हप्ता मिळणार नाहीये. काही महिलांनाच योजनेअंतर्गत जानेवारीचा हप्ता दिला जाणार आहे. यामागे काही कारणे आहेत.लाडकी बहीण योजनेत फक्त पात्र महिलांनाच योजनेचा लाभ मिळणार आहे. याचसोबत ज्या महिलांनी केवायसी केले आहे त्यांनाच योजनेचा लाभ मिळणार आहे. लाडकी बहीण योजनेच्या लाभार्थ्यांना केवायसी करणे अनिवार्य केले होते. तरीही अनेक महिलांनी केवायसी केले नाहीत. जवळपास ८४ लाख महिलांना योजनेचा लाभ मिळणार नाहीये. यातील काही महिलांनी केवायसी केलेले नाहीये. त्यामुळे त्यांचा लाभ बंद करण्यात आला आहे.

लाडकी बहीण योजनेत महिलांना केवायसी करणे अनिवार्य केले होते.(beneficiaries) केवायसी न केलेल्या महिलांच्या खात्यात पैसे जमा होणार नाहीत. याचसोबत ज्या महिलांनी खोटी माहिती देऊन योजनेचा लाभ घेण्याचा प्रयत्न केला आहे. त्यांची माहिती केवायसीमध्ये समोर आली आहे. त्यामुळे त्या महिलांचाही लाभ बंद केला आहे. याचसोबत ज्या महिलांची केवायसीमध्ये चूक झाली आहे त्यांचा लाभ तात्पुरता थांबवण्यात आला आहे. त्यांना काही दिवसांनी पैसे दिले जातील.
काल संध्याकाळपासूनच योजनेअंतर्गत जानेवारीचा हप्ता जमा होण्यास सुरुवात झाली आहे.(beneficiaries) यामध्ये काही महिलांना पैसे मिळाले आहे. काही महिलांच्या खात्यात आज पैसे जमा होतील. ज्या महिला पात्र नाहीत त्यांच्या खात्यात पैसे जमा केले जाणार नाहीत. त्यामुळे तुम्ही जर पात्र असाल आणि केवायसी केली असेल तर तुम्हाला पैसे मिळणार आहेत.
हेही वाचा :
नोकरी बदलल्याने निष्क्रीय झालेल्या PF खात्यातील पैशांसंदर्भात सरकारचा मोठा निर्णय
हा देश म्हणजे हिऱ्याची खाण, भारताशी आहे खास नातं
जेवणाची योग्य वेळ काय? आरोग्याला कसा फायदा होणार जाणून घ्या