‘ससुराल सिमर का’ मधून घराघरात पोहोचलेली प्रसिद्ध अभिनेत्री दीपिका (informed)कक्कर पुन्हा एकदा आरोग्याच्या समस्या अनुभवत आहे. काही महिन्यांपूर्वी तिला लिव्हर कॅन्सरचे निदान झाले होते, त्यानंतर तिला यशस्वी सर्जरी करण्यात आली आणि ती हळूहळू सर्वसामान्य आयुष्यात परतली होती. मात्र, आता तिला पोटात तीव्र वेदना जाणवू लागल्याने तातडीने रुग्णालयात तपासणीसाठी जाण्याची गरज भासली.या अद्ययावत माहितीचे अपडेट खुद्द दीपिकाने व्लॉगद्वारे चाहत्यांना दिले. व्लॉगमध्ये तिने सांगितले की तिच्या पोटात सिस्ट गाठ झाली असून, तिच्यावर प्रोसिजर करणे आवश्यक आहे. सिटी स्कॅनमध्ये सिस्टची साइज 1.3 सेंटीमीटर असल्याचे स्पष्ट झाले. दीपिकाच्या पोटासोबतच खांदासुद्धा दुखत असल्याचे तिने सांगितले आणि या वेदनेमुळे ती चिंतित होती. तथापि, इतर सर्व रिपोर्ट्स नॉर्मल असल्याचे तिने स्पष्ट केले.

शोएब आणि दीपिकाने रुग्णालयातूनच हा नवीन व्लॉग पोस्ट केला. शोएब म्हणाला, (informed) ‘दोन दिवसांपासून दीपिकाच्या पोटात खूप वेदना होत होत्या. काल वेदना अधिक तीव्र झाल्यामुळे तिला डॉक्टरांकडे आणलं. सिटी स्कॅनमध्ये पोटात सिस्ट असल्याचे निदान झाले. याशिवाय इतर सर्व रिपोर्ट्स नॉर्मल आहेत.’दीपिकाने तिच्या अनुभवाबद्दल खुलासा करत म्हटले, ‘लिव्हर कॅन्सर झाल्यापासून माझ्या मनात नेहमीच भीती आहे की पुन्हा कॅन्सर होऊ नये. डॉक्टरांनी पोटातील सिस्टवर उपचार करण्याचा निर्णय घेतला आहे. ही कोणतीही मोठी शस्त्रक्रिया नाही; छोट्या प्रोसिजरने सिस्ट बर्न केली जाईल. त्यासाठी मला तीन ते चार दिवसांसाठी रुग्णालयात राहावं लागेल. आम्ही अल्लाहचे आभार मानतो की सुरुवातीच्या स्टेजमध्येच सिस्टबद्दल माहिती मिळाली.’

दीपिकाने चाहत्यांना सल्ला दिला की, ‘छोट्या छोट्या वेदनेकडे दुर्लक्ष करू नका. (informed)आरोग्याची लक्ष देणे महत्त्वाचे आहे. माझ्यासाठी प्रार्थना करा.’ व्लॉगवर चाहत्यांनी कमेंट्स करत दीपिकाला लवकर बरे होण्यासाठी शुभेच्छा दिल्या आहेत. अनेकांनी तिला मानसिक आधार दिला तर काहींनी तिच्या स्वास्थ्याबाबत काळजी व्यक्त केली.विशेषज्ञांचे म्हणणे आहे की, लिव्हर कॅन्सरवर मात करणाऱ्या रुग्णांसाठी या प्रकारच्या सिस्टसारख्या समस्या तातडीने लक्षात घेणे आवश्यक आहे. सुरुवातीच्या स्टेजमध्ये उपचार घेतल्यास रुग्ण जलद बरे होऊ शकतात, म्हणून दीपिकाचे वेळेवर तपासणीसाठी जाणे अत्यंत महत्त्वाचे ठरले. दीपिकाचा हा अनुभव चाहत्यांसाठीही जागरूकतेचा संदेश आहे. छोट्या वेदनांकडे दुर्लक्ष न करता नियमित तपासण्या आणि डॉक्टरांचा सल्ला घेणे आरोग्याच्या दृष्टीने खूप महत्त्वाचे आहे.

हेही वाचा :

नोकरी बदलल्याने निष्क्रीय झालेल्या PF खात्यातील पैशांसंदर्भात सरकारचा मोठा निर्णय

हा देश म्हणजे हिऱ्याची खाण, भारताशी आहे खास नातं

जेवणाची योग्य वेळ काय? आरोग्याला कसा फायदा होणार जाणून घ्या

By admin

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *