कोल्हापूर जिल्ह्यात अल्पवयीन मुलींच्या सुरक्षिततेचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर (missing)आला असून, शनिवारी रात्री एका अल्पवयीन मुलीला फूस लावून पळवून नेऊन तिच्यावर अत्याचार झाल्याचा प्रकार उघडकीस आला. या घटनेनंतर संशयित मुलाला तात्काळ अटक करावी, या मागणीसाठी तब्बल पाचशेहून अधिक नागरिकांचा जमाव पोलिस ठाण्यासमोर जमल्याने परिसरात काही काळ तणावाचे वातावरण निर्माण झाले.जिल्ह्यात मागील एक वर्षात विविध पोलिस ठाण्यांत अल्पवयीन मुली बेपत्ता झाल्याचे तब्बल २४१ गुन्हे दाखल झाले आहेत. यापैकी २३० मुलींचा शोध घेण्यात पोलिसांना यश आले असले, तरी अद्यापही काही प्रकरणांमध्ये मुली सापडलेल्या नाहीत. वयात आलेल्या मुली घरातून पळून जाण्याचे प्रमाण वाढत असल्याने पालकांसह समाजाची जबाबदारीही अधिक वाढली आहे.

मुली बेपत्ता होण्यामागे अनेक सामाजिक कारणे पुढे येत आहेत. (missing)कुटुंबातील व्यसनाधिनता, पालकांमधील सततचे वाद, मुलांकडे होणारे दुर्लक्ष, असुरक्षिततेची भावना तसेच मोबाईलच्या अतिवापरामुळे आभासी जगात रमणे याचा गंभीर परिणाम मुलींच्या मानसिकतेवर होत असल्याचे पोलिस तपासातून समोर आले आहे. काही वेळा कोणत्याही मुलासोबत नसतानाही मैत्रिणींच्या संगतीने मोठ्या शहरांकडे जाण्याचे प्रकार घडत आहेत.ही परिस्थिती रोखण्यासाठी पोलिस प्रशासनाकडून निर्भया पथकांच्या माध्यमातून सातत्याने प्रयत्न सुरू आहेत. शाळा आणि महाविद्यालयांमध्ये समुपदेशन, छेडछाड करणाऱ्यांवर कारवाई, पाठलागाच्या घटनांवर तातडीचा हस्तक्षेप केला जात आहे.
जिल्ह्यात सहा विभागांत निर्भया पथके कार्यरत असून, कारवाईसोबतच मुली (missing)आणि पालकांशी संवाद वाढवण्यावर भर दिला जात आहे.अल्पवयीन मुलगी बेपत्ता झाल्यास तात्काळ अपहरणाचा गुन्हा दाखल करून जलद तपास सुरू केला जातो. शाळा किंवा महाविद्यालयातून अचानक मुलगी गायब झाल्यास संबंधित संस्थांवरही जबाबदारी निश्चित केली जाते. वाढत्या घटनांच्या पार्श्वभूमीवर पालकांनीही अधिक सजग राहून मुलींशी संवाद वाढवणे अत्यावश्यक बनले आहे, असे आवाहन पोलिस प्रशासनाकडून करण्यात येत आहे.
हेही वाचा :
पंचायत समिती निवडणूक रणधुमाळी; उमेदवारीसाठी रस्सीखेच सुरू
भाजपचे नगरसेवक काँग्रेसच्या संपर्कात; वडेट्टीवारांचा दावा, सुधीर मुनगंटीवार म्हणाले…
सर्वात मोठी बातमी! लाडकी बहीण योजनेचा हप्ता बंद