जेवणानंतर पोट फुगणे, जळजळ होणे किंवा अस्वस्थ वाटणे ही लक्षणे (acidity)अनेकदा अ‍ॅसिडिटी म्हणून दुर्लक्षित केली जातात. मात्र हीच लक्षणे पित्ताशयातील खडे गॉलब्लॅडर स्टोन्स किंवा पित्ताशयाच्या इतर आजारांचीही असू शकतात. त्यामुळे चुकीचे निदान, घरगुती उपायांवर अवलंबून राहणे किंवा दीर्घकाळ अॅसिडिटीची औषधे घेणे आरोग्यासाठी धोकादायक ठरू शकतं.तज्ज्ञांच्या मते, अॅसिडिटी आणि पित्ताशयाच्या त्रासामधला सर्वात महत्त्वाचा फरक म्हणजे वेदनेचे स्थान. जेव्हा पित्ताचा त्रास असतो तेव्हा पोटाच्या उजव्या वरच्या भागात दुखतं. या वेदना पाठीकडे किंवा खांद्यापर्यंत पसरत असतात. तर याचा उलट परिणाम अॅसिडिटीमध्ये होतो. त्यामध्ये तुम्हाला ढेकर येतात, छातीत किंवा पोटाच्या मधोमध जळजळ, पोट फुगणे अशी लक्षणं जाणवतात. याच्या वेदना खूप तीव्र नसतात.

जेव्हा तुम्ही तेलकट पदार्थ खाता, तेव्हा तुमच्या शरीराचं नुकसान होत असतं. (acidity)पण पित्ताशयात संसर्ग किंवा सूज म्हणजेच कोलेसिस्टायटिस झाल्याने ताप येऊ शकतो. जर कावीळ, ताप आणि तीव्र वेदना अशी तिन्ही लक्षणं दिसली तर कॉमन बाइल डक्टमध्ये किंवा लिव्हरमध्ये खडे अडकून कोलॅन्जायटिस झाल्याची शक्यता असते, जी गंभीर स्थिती मानली जाते.

बिलिअरी पेनमध्ये उजव्या भागात वरच्या पोटात किंवा अॅपिगॅस्ट्रिक भागात होणारं दुखणं असतं. (acidity) जेवणानंतर यामध्ये वेदना सुरू होतात. सहा तासांपेक्षा कमी काळ ही वेदना होते. कारण पित्तनलिकेत खडा तात्पुरता अडथळा निर्माण करतो आणि नंतर सरकतो. मात्र वारंवार असा त्रास होत असेल तर तपासणी महत्वाची ठरेल.अॅसिडिटी आणि पित्ताशयाचे आजार यांची लक्षणे सारखीच वाटतात. त्यामुळे अनेक जण वर्षानुवर्षे अॅसिडिटीची औषधे घेत राहतात. मात्र उपचाराला प्रतिसाद न देणारी अॅसिडिटी दुर्लक्षित करू नका, असा तज्ज्ञांचा सल्ला आहे. अशा वेळी अल्ट्रासाऊंडसारखी साधी आणि प्रभावी तपासणी करून पित्ताशयातील विकार शोधणं आवश्यक ठरेल.

हेही वाचा :

नोकरी बदलल्याने निष्क्रीय झालेल्या PF खात्यातील पैशांसंदर्भात सरकारचा मोठा निर्णय

हा देश म्हणजे हिऱ्याची खाण, भारताशी आहे खास नातं

जेवणाची योग्य वेळ काय? आरोग्याला कसा फायदा होणार जाणून घ्या

By admin

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *