मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेच्या लाभार्थ्यांसाठी महत्त्वाची बातमी समोर आली आहे.(installments) आता महिलांच्या रखडलेल्या हप्त्याबाबत अपडेट आली आहे.आता लवकरच महिलांना रखडलेले हप्ते मिळणार आहेत. लाडकी बहीण योजनेत महिलांना जानेवारी- फेब्रुवारीचा हप्ता दिला नाहीये. आता हे हप्ते येण्याचा मार्ग मोकळा झाला आहे.पात्र लाडक्या बहि‍णींना लवकरच जानेवारी-फेब्रुवारीचा हप्ता मिळणार आहे, असं सांगितलं जात आहे. दरम्यान, जानेवारीचा हप्ता जमा होण्यास कालपासून सुरुवात झाली आहे. त्यानंतर फेब्रुवारीचा हप्ता दिला जाणार आहेत. हा हप्ता जमा करण्यासाठी सरकारने निधीची व्यवस्था पूर्ण केली आहे.

नुकत्याच झालेल्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत आचारसंहिता होती.(installments) त्यामुळे योजनेचा हप्ता जमा होण्यास उशिर झाला होता. मात्र, आता निवडणुका संपल्यानंतर ही प्रक्रिया जलद केली आहे.आता लाडकी बहीण योजनेच्या हप्त्यासाठी सरकारने सामाजिक न्याय विभागाच्या खात्यातून महिला व बालविकास विभागाकडे निधी वितरित केला जाणार आहे. एकूण ९८.२५ कोटी रुपये हस्तांतरित केले आहे. यानंतर महिलांना हप्ता मिळणार आहे.

केवायसीमध्ये चुका असल्यामुळे कोट्यवधी महिलांना योजनेचा लाभ मिळाला नाही. (installments)आता या महिलांना केवायसी करण्यासाठी ३१ मार्चपर्यंतची मुदत दिली आहे. तोपर्यंत तुम्ही केवायसी करुन माहिती अपडेट करा. अन्यथा तुमचाही लाभ बंद होईल. दरम्यान, या महिलांचे डिसेंबरपासूनचे हप्ते रखडलेले आहे. या महिलांना केवायसी केल्यानंतरच एकत्र पैसे दिले जातील, असं सांगितलं जात आहे.

ही वाचा :

नोकरी बदलल्याने निष्क्रीय झालेल्या PF खात्यातील पैशांसंदर्भात सरकारचा मोठा निर्णय

हा देश म्हणजे हिऱ्याची खाण, भारताशी आहे खास नातं

जेवणाची योग्य वेळ काय? आरोग्याला कसा फायदा होणार जाणून घ्या

By admin

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *