भारताची आघाडीची दूरसंचार कंपनी भारती एअरटेल लिमिटेडने 2025-2026 या आर्थिक वर्षाच्या पहिल्या तिमाहीत जबरदस्त कामगिरी केली आहे.(beats )एअरटेलने टेलिकॉम क्षेत्रात नफ्याच्या बाबतीत चांगली वाढ दर्शविली आहे.एप्रिल 2025 ते जून 2025 दरम्यानचे आकडेच सर्व काही सांगत आहेत. या तिमाहीत एअरटेलने 5948 कोटींचा निव्वळ नफा कमावला आहे. मागच्या वर्षीच्या तिमाहीपेक्षा हा नफा 43 टक्क्यांनी अधिक आहे. एअरटेलचा एकत्रित महसूलही मोठ्या वाढीसह 49,463 कोटींवर पोहोचला आहे.
मागच्या वर्षी याच तिमाहीत हा आकडा 38506 कोटी होता. वार्षिक आधारावर महसुलात 28 टक्क्यांनी वाढ झाली आहे. फक्त वार्षिकच नाही तर कंपनीचा निकाल तिमाही दर आधारावरही चांगला आहे. जानेवारी 2025 ते मार्च 2025 या तिमाहीच्या तुलनेत महसुलात 3.3 टक्क्यांनी वाढ झाली आहे. दुसरीकडे, शेअर बाजारात वार्षिक आधारावर, 31.70 टक्क्यांची वाढ नोंदवली गेली आहे. त्यामुळे गुंतवणूकदारांसाठी एक मजबूत पर्याय तयार झाला आहे.

एप्रिल ते जून 2025 या तिमाहीत एअरटेलने 5,948 कोटी रुपयांचा निव्वळ नफा कमावला आहे. गेल्या वर्षीच्या याच तिमाहीतील 4159 कोटी रुपयांच्या नफ्यापेक्षा 43 टक्के अधिक आहे. जिओबाबत सांगायचं तर या तिमाहीत त्यांना 324.66 कोटींचा नफा झाला आहे. गेल्या वर्षी याच कालावधीत 312.63 कोटींचा नफा होता. (beats )म्हणजेच जिओच्या नफ्यात किरकोळ वाढ झाली आहे. दोन्ही कंपन्यांच्या नफ्यातील आकडेवारीची तुलना केली तर एअरटेलने नफ्यात जिओला 18.3 पट मागे टाकले आहे. जिओ फायनान्शियलचा महसूल 612.46 कोटी होता.

गेल्या वर्षीच्या 417.82 कोटींच्या तुलनेत ही वाढ 46.6% आहे.टक्केवारीत जिओची वाढ निश्चितच वेगाने होत आहे. पण एकूण महसुलाबद्दल बोलायचं तर, एअरटेलचा स्केल जिओ फायनान्शियलपेक्षा सुमारे 80 पट मोठा आहे.एअरटेलची कमाई फक्त भारतापुरती मर्यादित नाही. (beats )या तिमाहीत देशातील त्यांच्या महसुलात 2.3% वाढ झाली आहे, तर आफ्रिकेत 6.7% वाढ नोंदवली गेली आहे. दुसरीकडे, शेअर बाजारातही एअरटेलची विश्वासार्हता दिसून आली. 5 ऑगस्ट 2025 रोजी कंपनीचा शेअर नॅशनल स्टॉक एक्सचेंज वर 0.8 % वाढून 1930 वर बंद झाला. म्हणजेच कंपनीने बाजारात स्थिरता राखली. गेल्या सहा महिन्यांत एअरटेलच्या शेअरने 16.25% परतावा दिला आहे.
हेही वाचा :