घरात नवजात बाळ येणं हा प्रत्येकासाठी आनंदाचा क्षण असतो. घरातील प्रत्येक सदस्य बाळाची काळजी घेण्यासाठी उत्सुक असतो.(newborn)पण काहीवेळा बाळाची काळजी घेताना काही चुका होतात, ज्यामुळे बाळाला अनेक समस्यांचा सामना करावा लागतो. जर तुमच्याही घरात नवजात बाळ असेल, तर काही महत्त्वाच्या गोष्टींची काळजी घेऊन तुम्ही त्याला अनेक त्रासांपासून वाचवू शकता. चला, बाळाची काळजी घेण्यासाठी अशा 4 सोप्या आणि महत्त्वाच्या टिप्स जाणून घेऊया.
1. हात स्वच्छ धुवा
नवजात बाळाला जवळ घेण्यासाठी किंवा त्याला खेळवण्यासाठी प्रत्येकजण तयार असतो. पण बाळाला हाताळण्यापूर्वी हात स्वच्छ धुणे अत्यंत आवश्यक आहे. अनेकदा उत्साहाच्या भरात आपण हात धुवायला विसरतो, ज्यामुळे जंतू बाळाच्या संपर्कात येऊ शकतात. यामुळे बाळाला संसर्ग होण्याची आणि त्याची रोगप्रतिकारशक्ती कमी होण्याची शक्यता असते. त्यामुळे बाळाला घेण्यापूर्वी नेहमी आपले हात साबण आणि पाण्याने स्वच्छ धुवा.
2. बाळाला काळजीपूर्वक उचला
बाळाला कसं उचलावं, याचा अनुभव अनेकांना नसतो. विशेषतः, पहिल्यांदा आई झालेल्या महिलांना बाळ उचलताना थोडं अवघड वाटू शकतं. बाळाला अयोग्य पद्धतीने उचलल्यास त्याच्या मानेला झटका बसू शकतो. त्यामुळे बाळाला उचलताना त्याच्या डोक्याला आणि मानेला योग्य आधार देणे खूप महत्त्वाचे आहे.(newborn) यासाठी तुम्ही घरातील ज्येष्ठ व्यक्तींची मदत घेऊ शकता.
3. बाळाला जास्त हलवू नका
लहान बाळाला झोपवण्यासाठी किंवा रडताना शांत करण्यासाठी अनेक लोक त्याला जोरात हलवू लागतात. यामुळे बाळाच्या मेंदूतील रक्तप्रवाहांवर परिणाम होऊ शकतो. मोठ्यांना जरी ही हालचाल कमी वाटत असली, तरी बाळासाठी ती खूप वेगवान असू शकते. त्यामुळे नवजात बाळाला हलवण्यापासून दूर राहणे चांगले.
4. आंघोळ घालताना काळजी घ्या
नवजात बाळाला आंघोळ घालणे एक जोखमीचे काम असू शकते(newborn) आंघोळ घालताना बाळाच्या डोळ्यात, नाकात किंवा तोंडात पाणी जाण्याचा धोका असतो. यामुळे बाळाला श्वास घेण्यासही त्रास होऊ शकतो.
बाळाला सुरक्षितपणे आंघोळ घालण्यासाठी अनुभवी व्यक्तीची मदत घ्या.
तुम्ही बाळाला आंघोळ घालण्याऐवजी, कोमट पाण्यात सुती कापड भिजवून बाळाचं अंग पुसू शकता. हा एक सुरक्षित पर्याय आहे, ज्यामुळे बाळाला स्वच्छ ठेवता येते.
हेही वाचा :