डोनाल्ड ट्रम्प हे मागील काही दिवसांपासून भारताबद्दल(statements) वादग्रस्त विधान करताना दिसत आहेत. टॅरिफचा मुद्दा तापलेला असतानाच डोनाल्ड ट्रम्प यांनी मोठे भाष्य केले. देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनीही टॅरिफच्या मुद्दावरून मोठा संदेश दिला.

अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प आणि रशियाचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर पुतिन यांच्यात बैठक झाली. या बैठकीचा अजेंडा ठरला होता. मात्र, अनेक मुद्द्यांवर या बैठकीत चर्चा झाली. (statements)रशियाकडून कच्चे तेल खरेदी करणाऱ्या देशांवर अमेरिकेकडून कारवाई करण्यात आली आणि मोठा टॅरिफ लावण्यात आला. ज्यानंतर या भेटीला अधिक महत्व प्राप्त झाले. डोनाल्ड ट्रम्प यांच्यासोबतच्या भेटीनंतर अमेरिकेबद्दल बोलताना पुतिन दिसले. मात्र, डोनाल्ड ट्रम्प यांनी बोलणे टाळले होते. आता त्यांनी देखील या भेटीवर भाष्य केले आहे. त्यांनी सोशल मीडियावर पोस्ट केली.
डोनाल्ड ट्रम्प यांनी म्हटले की, Big progress on Russia, stay tuned… म्हणजेच रशियावर मोठी प्रगती झाली आहे..बघत रहा…डोनाल्ड ट्रम्प आणि व्लादिमीर पुतिन यांच्याकडून अगोदरच सांगण्यात आले की, अलास्कामधील बैठक चांगली झाली आणि काही सकारात्मक गोष्टींवर चर्चा झाली. पुतिन यांनीही म्हटले की, मी अमेरिकेच्या प्रशासनाचे काैतुक करतो की, त्यांनी या मुद्दावर पुढे आले. पहिल्यांचा अशाप्रकारे थेट चर्चा झाल्याने आनंद झाल्याचेही त्यांनी म्हटले.
व्लादिमीर पुतिन आणि डोनाल्ड ट्रम्प यांच्या भेटीमध्ये टॅरिफच्या मुद्दावर देखील चर्चा झाल्याचे सांगितले जाते. या महत्वाच्या भेटीपूर्वी डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून रशियाला धमकावले जात होते. मात्र, यानंतर त्यांची थेट भाषाच बदलली आहे. आता आज युक्रेनचे राष्ट्रपती अमेरिकेच्या दाैऱ्यावर आहेत. यादरम्यान त्यांची आणि डोनाल्ड ट्रम्प यांची भेट होणार आहे. युद्ध संपवण्यासाठी डोनाल्ड ट्रम्प हे काही अटी त्यांच्यापुढे ठेवणार आहेत. आता ते हे सर्व अटी मान्य करतात का? हे देखील पाहण्यासारखे ठरणार आहे.
डोनाल्ड ट्रम्प आणि पुतिन यांच्या भेटीनंतर भारताला अपेक्षा होती की, डोनाल्ड ट्रम्प यांची भारताबद्दलची भाषाय बदलेले मात्र तसे अजिबात होऊ शकले नाही. डोनाल्ड ट्रम्प यांनी त्यानंतरही भारताबद्दल भडकावू भाषण केले. भारताची काहीही झाले तरीही टॅरिफमधून सुटका होणार नसल्याचे त्यांनी म्हटले. भारताने देखील अमेरिकेच्या टॅरिफच्या विरोधात रणनीती तयार केली आहे. आता अमेरिकेच्या विरोधात नेमकी काय अॅक्शन घेतो याकडे सर्वांच्या नजरा लागल्याचे बघायला मिळत आहे.
हेही वाचा :
शेवटच्या श्रावणी सोमवारी उपवासाला बनवा पौष्टिक स्मूदी, दिवसभर राहाल उत्साही
दिवस उजाडला… पण नावापुरता! पावसाच्या ढगांमुळं मुंबईपासून कोकणापर्यंत काळोख, सतर्कतेचा इशारा जारी
आकाशातून निसर्ग पाहण्याचा अनोखा अनुभव घ्यायचा असेल तर ‘या’ आहेत भारतातील सर्वोत्तम Ropeway Rides